Health Tips : तुम्हीपण चहासोबत बिस्कीट खाताय का? मग ही बातमी वाचाच!

Eating Biscuits With Tea : तुम्ही कधी तरी हा विचार केला आहे का? दिवसातून चहासोबत आपण कितीवेळा बिस्किटे खात असतो? जर तुम्ही याचे दुष्परिणाम वाचाल तर धक्काच बसेल... 

Updated: Jun 8, 2023, 05:24 PM IST
Health Tips : तुम्हीपण चहासोबत बिस्कीट खाताय का? मग ही बातमी वाचाच!  title=
Disadvantages Of Eating Biscuits With Tea

Disadvantages Of Eating Biscuits With Tea: आपल्या दिवसाच्या सुरुवात सकाळी उठल्यावर एक कप चहा त्यात बिस्किट याशिवाय होत नाही. उपाशीपोटी चहा प्यायल्याने अॅसिडीटी होण्याची शक्यता असते असे तुम्हाला लहानपणापासून सांगितले जाते. म्हणूनच आपल्याला चहासोबत काही प्रमाणात बिस्किटे खाण्याची ही सवय लागली. 

बरेच लोक चहा किंवा कॉफीसोबत अनेकदा बिस्किटे खातात, फक्त सकाळीच नाही तर दिवसभरात तुम्ही सकाळी किती बिस्किटे खातात? याशिवाय तुम्ही दररोज खात असलेल्या बिस्किटांमध्ये कोणते घटर असतात? याचा तुम्ही कधी विचार केलाय का? तज्ज्ञांच्या मते, जास्त बिस्किट खाल्ल्याने चरबी वाढते. खरंतर बिस्किटे बनवण्यासाठी रिफाइंड मैदा आणि हायड्रोजन फॅट वापरतात. त्यामुळे वजन वाढते. त्यामुळेच चहासोबत बिस्किटेही असली पाहिजेत. पण याच बिस्किटांचे दुष्परिणाम जाणून घ्या...

मधुमेह वाढतो

कोणतेही अन्न खाल्ल्यानंतर केवळ शरीराचे वजनच नाही तर इन्सुलिनची पातळीही वाढते. खरंतर बिस्किटमध्ये इमल्सीफायर, प्रिझर्व्हेटिव्ह आणि कलरिंग सारखी रसायने मिसळली जातात जेणेकरून ते जास्त काळ टिकेल. यासोबतच त्यात गोड आणि साखरेचे प्रमाण अधिक आहे, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते.

सुरकुत्या पडणे

आजकाल खाण्यापिण्यामुळे चेहऱ्यावर पुरळ उठणे ही एक सामान्य गोष्ट आहे. पण याकडे दुर्लक्ष करू नकाय चहा-बिस्किट कॉम्बिनेशन हे खरतरंही एक प्रमुख कारण आहे. याचे कारण म्हणजे बिस्किटांमध्ये आढळणाऱ्या शुद्ध साखरेमध्ये पौष्टिक घटक नसतात. याच कारणामुळे त्वचेवर लवकर सुरकुत्या पडतात. यासाठी वसायुक्त गोष्टींचा वापर करावा. असे केल्याने केवळ सुरकुत्यांची समस्याच नव्हे तर पचनक्रियाही सुधारते.

वजन वाढणे

बिस्किटमध्ये उच्च कॅलरी आणि हायड्रोजनेटेड फॅट मुबलक प्रमाणात असते. परिणामी लठ्ठपणा ही वाढला जातो. सामान्य बिस्किटांमध्ये किमान 40 कॅलरीज असतात. तसेच, प्रत्येक बिस्किटात भाजलेल्या क्रिम्स किंवा नुकत्याच बेक्ड केलेल्या प्रति बिस्किटमध्ये 100-150 कॅलरीज असतात. 

दातांवर वाईट परिणाम

चहा-बिस्किटाच्या मिश्रणाचा दातांवर चुकीचा प्रभाव टाकतात, खरंतर चहा आणि बिस्किटांमध्ये असलेले सुक्रोज दात किडण्यास कारणीभूत ठरते. याचे सेवन केल्याने दात लवकर पडणे, दात किडणे किंवा तोंडातील बॅक्टेरियासारखे काही आजार होतात. दातदुखी, दातांचा रंग खराब होणे, त्यावर डाग पडणे अशा समस्या उद्भवू शकतात.

 

 

 

( Disclaimer : वर देण्यात आलेल्या गोष्टी केवळ सामान्य माहिती प्रदान करतात. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. झी 24 तास या गोष्टींची पुष्टी करत नाही. )