मुंबई : आपल्या आहारात कोथिंबीरला महत्वाचे स्थान आहे. कोथिंबीर शिवाय जेवण होत नाही. आमटी, पोहे, उपमा, मिसळ यांना कोथिंबीर लज्जत आणते. कोथिंबीर टाकून अनेक पदार्थ सजवले जातात. हीच कोथिंबीर आरोग्य वर्धनक आहे.
- आहारात कोंथिबीरचा समावेश केल्याने त्याचे फायदे दिसून येतात. भूक वाढविण्यास मदत होते. अतिसार किंवा पचनास अडचणीवर कोंथिंबीर उपयुक्त ठरते. आहारात समावेश केल्याने त्याचे फायदे दिसून येतात.
- डोळ्यांची जळजळ किंवा आग होत असल्यास कोंथिंबीर १ किंवा २ थेंब रस डोळ्यात टाकावा. त्यामुळे डोळ्यांना आराम मिळतो.
- चेहऱ्यावरील मुरुमांसाठी कोथिंबीर खूप लाभदायक आहे. एक चमचा कोथिंबीरच्या रसात हळद टाकून मिश्रम लावल्यास चांगलाआराम पडतो.
- मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव होत असल्यास पाण्यात थोडे धन आणि साखर टाकून ते पाणी प्यायल्यास त्याचा फायदा होतो.
- गरोदर स्त्रियांनी जास्त उलटीचा त्रास होत असल्यास भातामध्ये धना पावडर घालून खावे, त्याचा चांगला फायदा होतो.