टॉयलेटमध्ये फोन वापरण्याचा हा आहे धोका

टॉयलेटमधये फोन घेऊन जाण्याची सवय असेल तर वेळीच सावध व्हा. कारण तुम्ही टॉयलेटमध्ये फोन घेऊन जाता म्हणजे गंभीर आजाराल निमंत्रण देऊन येता. कसे? ते घ्या जाणून…

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Sep 20, 2017, 09:12 PM IST
टॉयलेटमध्ये फोन वापरण्याचा हा आहे धोका title=

मुंबई : टॉयलेटमधये फोन घेऊन जाण्याची सवय असेल तर वेळीच सावध व्हा. कारण तुम्ही टॉयलेटमध्ये फोन घेऊन जाता म्हणजे गंभीर आजाराल निमंत्रण देऊन येता. कसे? ते घ्या जाणून…

फोन म्हणजे आपल्यापैकी अनेकांचा जीव की प्राण. केवळ अंघोळ करतानाच आपल्यापैकी काही महाभाग फोन दूर ठेवतात. इतर वेळी अगदी झोपतानाही ही मंडळी फोन सोबत घेऊनच झोपतात. काहींचा कहर तर असा की ही मंडळी चक्क टॉयलेटमध्येही फोन घेऊन जातात. त्यामुळे फोन आपल्याकडील एक असा आजार आहे जो टाळता येणे कठीण आहे. कुणी सांगावं भविष्यात व्यसनमुक्ती केंद्राप्रणामे फोनमुक्ती केंद्रंही निघतील. गंमतीचा भाग सोडा आणि इकडे लक्ष द्या.

अभ्यासकांनी नुकत्याच केलेल्या एका संशोधनात दिसून आले आहे की, टॉयलेटमध्ये फोन घेऊन गेल्याने तुम्हाला विविध आजार होऊ शकतात. टॉयलेटमध्ये विविध आजाराला निमंत्रण देणारे किटाणू नेहमीच असतात. तुम्ही ज्या पद्धतीने टॉयलेटमध्ये फोन घेऊन बसता त्यात काही किटाणून फोनलाही चिकटण्याची शक्यता असते. कारण तुमचा अस्वच्छ हात आणि फोन याचा फार जवळून संबंध येतो. तसेच, टॉयलेटमधून बाहेर आल्यावर तुम्ही टॉयलेट साफ केलेला हात तर स्वच्छ करता. पण, फोनचे काय करणार? तो कास स्वच्छ करणार. तो पाण्यात तर भिजवू शकत नाही. त्यामुळे फोनला लागलेले किटाणून तसेच तुमच्यासोबत बाहेर येतात.

अशा वेळी टॉयलेटचा हात स्वच्छ करूनही काही फायदा होत नाही. कारण फोन हातात घेतल्यामुळे तुमचे हात (जे तुम्ही नुकतेच स्वच्छ केलेले असतात) पुन्हा अस्वच्छ होतात. त्यातही तुम्ही टॉयलेट कोणते आणि कुठले वापरात यावर बरेच अवलंबून असते. तुम्ही जर मॉल, हॉस्पिटल, किंवा सार्वजनिक टॉयलेट वापरत असाल तर हा धोका अधिक वाढतो. म्हणूनच टॉयलेटमध्ये फोन अजिबात वापरू नका.