Weight Gain : शरीरातील पाण्याची कमरतरता वाढवतेय तुमचं वजन?

योग्य आहार आणि नियमित व्यायामाव्यतिरिक्त अजूनही काही गोष्टी वजन कमी करण्याच्या प्रक्रिेयेत महत्त्वाच्या आहेत.

Updated: May 4, 2022, 03:49 PM IST
Weight Gain : शरीरातील पाण्याची कमरतरता वाढवतेय तुमचं वजन? title=

मुंबई : वजन कमी करण्यासाठी आपण विविध पद्धतींचा अवलंब करतो. यामध्ये डाएट तसंच योगा या गोष्टीही तुम्ही करत असाल. मात्र तरीही तुमचं वजन कमी होत नाहीये का? मग या व्यतिरीक्त तुम्ही काही चुका करत असाल. योग्य आहार आणि नियमित व्यायामाव्यतिरिक्त अजूनही काही गोष्टी वजन कमी करण्याच्या प्रक्रिेयेत महत्त्वाच्या आहेत. आहारतज्ज्ञ रंजना सिंग यांनी वजन वाढीची इतर कारणं सांगितली आहेत.

पाण्याची कमतरता

पुरेसं पाणी न पिणं हे वजन वाढवण्यामागील कारण असू शकते. डॉ रंजना सिंह यांच्या म्हणण्यानुसार, आपण दररोज किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे. आपण हे न केल्यास पचनक्रियेचा योग्य पद्धतीने होत नाही आणि आपलं वजन वाढू शकतं. दरम्यान दररोज सकाळी कोमट पाणी पिण्यामुळे वजन कमी होऊ शकतं.

पूर्ण झोप न घेणं

पुरेशी झोप न घेतल्याने वजनात वाढ होते. आहारतज्ज्ञ डॉ. रंजना सिंह सांगतात, की रात्री 7 ते 8 तास झोप न घेतल्यामुळे शरीरात कोर्टीसोल नावाचा हार्मोन तयार होऊ लागतो. यामुळे आपल्याला दिवसभर थकवा जाणवतो. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, शक्य तितका वेळ शरीराला झोप द्या.

सकाळचा नाश्ता न करणं

आजकाल बहुतांश लोकं व्यस्त वेळापत्रकांमुळे सकाळी नाश्ता करत नाहीत. या कारणामुळे वजन वाढू शकतं. सकाळी नाश्ता न केल्याने चयापचय प्रणाली कमकुवत होऊ लागते. शिवाय आपल्याला पुन्हा पुन्हा भूक लागते. परिणाम आपण जास्त प्रमाणात खातो आणि वजन वेगाने वाढू लागतं.