ही व्हॅक्सीन सुरक्षित आहे का? व्हॅक्सीन नाव कसे पडले?

लसीकरणात काही जोखीम आहेत, परंतु सर्व औषधांप्रमाणेच लसींच्या फायद्यांसमोर हे काहीच नाही.

Updated: Mar 3, 2021, 10:25 PM IST
ही व्हॅक्सीन सुरक्षित आहे का? व्हॅक्सीन नाव कसे पडले? title=

मुंबई : कोरोना व्हॅक्सीनचा काही लोकांना, काही तास त्रास होत असल्याचं म्हटलं जात आहे. पण जगातील सर्वच साथीचे रोग हे लसींमुळे नियंत्रणात आले आहेत.  लस शोधण्याचा इतिहास पाहिला तर लस सुरक्षित आहे किंवा नाही हे तुम्हाला नक्कीच समजेल.

लसीचा प्रारंभिक प्रकार हा दहाव्या शतकात चिनी शास्त्रज्ञांनी शोधला होता.

परंतु 1796 मध्ये, एडवर्ड जेनर यांना आढळले की देवी (smallpox) नावाच्या सौम्य संसर्गाचा एक डोस देवीच्या तीव्र संक्रमणापासून संरक्षण करतो. त्याचा त्यांनी पुढील अभ्यास केला आणि त्याच्या सिद्धांताचीही चाचणी केली. त्याचे निष्कर्ष दोन वर्षांनंतर प्रकाशित झाले. तेव्हाच 'व्हॅक्सीन' या शब्दाचा उद्भव झाला. तो Vacca या लॅटिन शब्दापासून निर्माण झाला ज्याचा अर्थ गाय असा आहे.

ही लस वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात मोठं यश मानलं जातं. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, दरवर्षी सुमारे दोन ते तीन दशलक्ष लोकांचा या लसीमुळे जीव वाचतो.

बाजारात आणण्यापूर्वी ही लस व्यवस्थित तपासली जाते, असे सीडीसीचे म्हणणे आहे. त्याची प्रथम प्रयोगशाळांमध्ये आणि नंतर प्राण्यांवर तपासणी केली जाते. त्यानंतरच माणसांवर चाचण्या केल्या जातात.

बर्‍याच देशांमध्ये, स्थानिक औषध नियामकांकडून परवानगी घेतल्यानंतरच लोकांना लस दिली जाते. लसीकरणात काही जोखीम आहेत, परंतु सर्व औषधांप्रमाणेच लसींच्या फायद्यांसमोर हे काहीच नाही.

उदाहरणार्थ, बालपणाचे काही आजार जे एक पिढीपर्यंत अगदी सामान्य होते, ते या लसमुळे त्वरीत नाहीसे झाले आहे.

कोट्यवधी लोकांचा बळी घेणारा देवी smallpox हा रोग आता पूर्णपणे संपला आहे. परंतु यश मिळवण्यासाठी अनेकवेळा दशके लागतात. जागतिक लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर सुमारे 30 वर्षानंतर आफ्रिकेला पोलिओमुक्त असा एकमेव देश म्हणून घोषित करण्यात आले.

तज्ञांच्या माहितीनुसार कोव्हिड -19 विरोधात लसीकरण होण्यासाठी काही महिने किंवा काही वर्षे लागु शकतात, त्यानंतरच आपण सामान्य स्थितीत परत येऊ शकतो.