दररोज झोपण्याआधी करा याचे सेवन, एका आठवड्यात १० किलो वजन होईल कमी

सध्याच्या घडीला लठ्ठपणा ही सर्वात मोठी समस्या बनलीये. प्रत्येकजण या समस्येने ग्रस्त आहे. मोठेच नाही तर लहान मुलांमध्येही ही समस्या दिसून येते. 

Updated: Sep 19, 2018, 07:28 PM IST
दररोज झोपण्याआधी करा याचे सेवन, एका आठवड्यात १० किलो वजन होईल कमी

मुंबई : सध्याच्या घडीला लठ्ठपणा ही सर्वात मोठी समस्या बनलीये. प्रत्येकजण या समस्येने ग्रस्त आहे. मोठेच नाही तर लहान मुलांमध्येही ही समस्या दिसून येते. वजन वाढण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे खाणेपिणे आणि बदलती लाईफस्टाईल. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी एक असे ड्रिंक आहे ज्याने तुम्ही सोप्या पद्धतीने वजन कमी करु शकता.

हे ड्रिंक नैसर्गिक पद्धतीने बनवण्यात आलेय. ज्याच्या वापराने तुम्ही सोप्या पद्धतीने वजन कमी करु शकता. हे ड्रिंक तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यात मदत करते. याच्या वापराने तुम्ही एका आठवड्यात १० किलोपर्यंत वजन कमी होण्यास मदत होते. 

साहित्य 

एक सोललेली काकडी
अर्धा चमचा लिंबाचा रस
एक चमचा ताज्या कोरफडीचा रस
एक चमचा किसलेलं आलं
एक चमचा ओवा
एक कप पाणी

कृती 

सर्व पदार्थ भांड्यात टाकून मिक्सरमध्ये वाटून घ्या. यानंतर ग्लासमधून सर्व्ह करा.

हा ज्यूस दररोज रात्री झोपण्याआधी घ्या. ज्यूस फ्रेश असेल तर अधिक उत्तम. याचा अधिक फायदा होतो. दुसऱ्या दिवशी तुम्हाला मोठ्या प्रमाणात युरिन होईल. याद्वारे तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होईल. 
या ड्रिंकसोबत दररोज कमीत कमी २० मिनिटे एक्सरसाईजही करा. ज्यामुळे रक्तप्रवाह वाढेल. तुमचे फॅट अधिक बर्न होईल.