Green tea : तुम्हाला फीट राहण्यासाठी किंवा वजन (Weight loss) कमी करण्यासाठी ग्रीन टी हे आरोग्यदायी पेयं मानलं जातं. पण याचा सर्वाधिक उपयोग बेली फॅट (Belly fat) कमी करण्यासाठी केला जातो. कारण, बेली फॅट कमी करण्यासाठी ग्रीन टी फायदेशीर मानला जातो.
अनेक संशोधनातून असं दिसून आलंय की, ग्रीन टीचं सेवन वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला गती देतं. पण, तुम्हाला माहितीये का बेली फॅट कमी करण्यासाठी ग्रीन टी कसा बनवायचा आणि ग्रीन टी कोणत्या वेळी प्यायला पाहिजे.
बहुतेक लोकं ग्रीन टीची पानं उकळत्या पाण्यात टाकतात किंवा ग्रीन टी बॅग खूप गरम पाण्यात टाकतात. त्यामुळे हिरव्या चहाच्या पानांमध्ये असलेलं कॅटचिन खराब होतं. त्यापेक्षा आधी पाणी उकळा आणि नंतर 10 मिनिटे थंड होऊ द्या. यानंतर चहाची पानं घाला. ग्रीन टी बनवल्यावर पानं किंवा टी बॅग काढून त्याचं सेवन करा.
कॅटेचिन हे समान कंपाऊंड असतं जे वजन कमी करण्यास मदत करतं. बेली फॅट कमी करायचं असेल तर दररोज 3 कप ग्रीन टी प्या. पण, यासोबतच तुम्हाला खाण्याच्या अयोग्य सवयी आणि बैठी जीवनशैली या सवयी बंद कराव्या. वजन कमी करण्यासाठी ग्रीन टीचे हे प्रमाण युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड मेडिकल सेंटरच्या अहवालात सांगण्यात आले आहे.
वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी: ग्रीन टीचे सेवन केल्याने शरीरातील चयापचय क्रिया गतिमान होते, ज्यामुळे कॅलरीज ऊर्जेसाठी वापरल्या जातात. यासोबतच शरीरातील फॅट पेशींच्या आतील फॅटचं विघटन करून ते रक्तात स्थानांतरित होते. जिथे स्नायू त्याचा ऊर्जा म्हणून वापर करतात.