Pregnancy Early Symptoms : गर्भधारणा हा प्रत्येक दाम्पत्यासाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. असं असताना धावपळीच्या जगात गर्भधारणा ही जोखमीची होत चालली आहे. ताण-तणाव, कामाची धावपळ या सगळ्यामध्ये गर्भधारणा राहताना खूप अडचणी येतात. अशावेळी गर्भधारणेची गोड बातमी ही मासिक पाळी चुकायच्या आधीच मिळणे हे काही संकेतावरूनच ओळखू शकता.
महत्त्वाचं म्हणजे ही लक्षणे मासिक पाळी येण्याअगोदरच दिसून येतात. 3 ते 4 दिवसांतच गरोदरपणाची ही लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांवरून तुम्ही गोड बातमी जाणून घेऊ शकता. आणि पुढील दिवसांतच तशीच काळजी घेऊ शकता. पुढील 5 लक्षणांवरून तुम्ही ओळखू शकता की, गरोदर आहात की नाही.
(फोटो सौजन्य - iStock)
Cleveland Clinic च्या रिपोर्टनुसार, क्रॅम्पिंग हे गर्भधारणेचे लवकर आणि स्पष्ट लक्षण आहे. जर तुम्ही गर्भवती असाल तर तुम्हाला सौम्य पेटके येऊ शकतात. हे क्रॅम्प्स तुम्हाला तुमच्या मासिक पाळीत येणाऱ्या क्रॅम्प्ससारखेच असतील, परंतु ते तुमच्या खालच्या ओटीपोटात किंवा पाठीच्या खालच्या भागात असतील.
गर्भधारणेच्या सुरूवातीच्या लक्षणांमध्ये शरीराचे तापमान वाढणे हे दुसरे महत्त्वाचे लक्षण दिसू लागतात. ओव्युलेशनच्या अगोदर शरीराचे तापमान वाढते आणि पीरियड्स चक्रानंतर ते पुन्हा सामान्य होते. मात्र गर्भधारणे दरम्यान शरीराचे तापमान वाढलेलेच असते. हे गर्भावस्थेदरम्यान प्रोजेस्टेरोनच्या उच्च पातळीमुळे होते.
गर्भधारणा राहिली असेल तर महिलेच्या स्तनांमध्ये अनेक बदल होतात. जसे की, स्तनांमध्ये जडपणा, मुंग्या येणे आणि स्पर्श केल्यावरही वेदना होणे यासारखे बदल जाणवू लागतात. गर्भधारणेचे हे लक्षण अतिशय समजायला सोपे आहे. स्तनांचा आकार देखील गडद होतो.
मासिक पाळी येण्याअगोदरच गळ्याला खवखव जाणवल्यास तुम्ही गरोदर असल्याचे समजू शकता. गळ्याला जळजळ होणे आणि दुखणे हे सर्दी खोकल्याचे लक्षण नाही तर गरोदर असल्याचे लक्षण आहे.
हार्मोनल बदलामुळे या दिवसांमध्ये रोजच्यापेक्षा अधिक थकवा जाणतो. सुरुवातीच्या दिवसामध्ये महिलांना मोशन सिकनेस आणि मळमळ देखील जाणवते. अशावेळी फार वेळ उभं राहणं देखील कठीण होते. सतत झोपावे असे वाटणे हे देखील गरोदरपणाचे लक्षण आहे.
ही लक्षणे गर्भधारणेनंतर लगेच दिसून येतात. कारण जेव्हा एखादी स्त्री गरोदर राहते, त्यानंतर शरीरात हार्मोनल बदल होऊ लागतात. त्यामुळे योनीच्या पेशींची वाढ वेगाने होऊ लागते. यामुळे थोडासा स्त्राव होऊ शकतो. परंतु स्त्राव सोबत योनिमार्गात दुखणे, जळजळ किंवा वास येत असल्यास डॉक्टरांना दाखवावे. हे संसर्गाचे लक्षण असू शकते.