...म्हणून रोज अंडे खा!

संडे हो या मनडे, रोज खाएं अंडे, हे तर तुम्ही ऐकलेच असेल. 

Updated: Mar 10, 2018, 08:45 AM IST
...म्हणून रोज अंडे खा! title=

नवी दिल्ली : संडे हो या मनडे, रोज खाएं अंडे, हे तर तुम्ही ऐकलेच असेल. पण ही कोणतीही म्हण नसून हे अगदी खरे आहे. अंड्यात असलेले पोषकघटक केस, त्वचा आणि आरोग्यासाठी फायदेशीर असतात. अंडे खाल्याने शरीरातील बॅड कोलेस्ट्रोलचे प्रमाण कमी होते आणि हृदयविकारांची धोकाही कमी होतो.

पाहुया रोज अंडे का घ्यावे ते...

मेंदुची ताकद वाढते

अंड्यात कोलीन नवाचे पोषकघटक असते. यामुळे फक्त स्मरणशक्ती वाढत नाहीतर मेंदूची अॅक्टिव्हीटी तेज होते. परिणामी मेंदुची ताकद वाढते.

हाडे आणि दातांसाठी उपयुक्त

सांधेदुखी असल्यास किंवा दातांच्या समस्या असल्यास अंडे खाणे फायदेशीर ठरते. अंड्यात असलेल्या व्हिटॉमिन डी मुळे दात आणि हाडांचे आरोग्य सुधारते.

डोळ्यांच्या आरोग्यासाठी लाभदायी

दृष्टी सुधारण्यास अंडे लाभदायी ठरते. अंड्यात लुटेइन जेक्‍साथिनसारके अंटीऑक्सिडेंट असतात. त्यामुळे अंडे खाल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारते.

रक्ताची कमतरता भरुन काढण्यास फायदेशीर

अंड्यात असलेल्या आयर्नमुळे शरीरातील रक्ताची कमतरता भरुन निघण्यास मदत होते.

वजन कमी करण्यासाठी मदत

अनेक अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे की, वजन कमी करण्यास अंडे फायदेशीर ठरते. अंडे खाल्याने खूप वेळ भूक लागत नाही. त्यामुळे तुम्ही इतर तेलकट, तिखट असे बाहेरचे पदार्थ खाण्यापासून दूर राहता.