Eating Disorder ही समस्या गंभीर असून हा एक मानसिक आजार आहे. यामध्ये व्यक्ती गरजेपेक्षा जास्त खातो किंवा कमी खातो त्यामुळे त्याच्या आरोग्याचा धोका वाढतो. 15 ते 18 वयोगटातील मुलांमध्ये याचे प्रमाण सर्वाधिक असते . खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे किशोरवयीन मुलांमध्ये इटिंग डिसऑर्डरची समस्या निर्माण होते. इंटिग डिसऑर्डरच्या जनजागृतीसाठी 26 फेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत हा दिवस साजरा केला जातो. यासाठी आपण डॉ. आरती सिंग ज्या मदरहूड हॉस्पिटल्स, खारघर येथे पोषण आणि आहारतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडून याबाबत माहिती जाणार आहोत.
किशोरवयीन मुलांमध्ये मानसिक कारणांमुळे जसे की, सुंदर दिसणे आणि आपल्या बॉडी इमेजबद्दल खुश नसणे यांसारख्या कारणांचा समावेश होतो. चिंता आणि नैराश्य ही सुद्धा दोन महत्त्वाची कारणे आहेत. बारीक दिसणे वा कोणाला आपल्याकडे आकर्षिक करण्याच्या विचाराने, बॉडी शेमिंग तसेच शाळेत दुसऱ्या मुलांनी टिंगल उडवल्यावर सुधा किशोरवयीन मुलांमध्ये इटिंग डिसऑर्डर दिसून येऊ शकतो.