रस्त्यावर व्हेज मंच्युरिअन खाताय, सावधान... सत्य कळल्यावर हादराल

Gobi Manchurian Ban : लहान मुलांपासून तरुणांपर्यंत सध्या चायनिज पदार्थाची सर्वानाच चटक लागली आहे. बाहेर जेवायला जायचे म्हटले की अनेक जण चायनिज खाण्याचाच बेत करतात. पण चायनिज पदार्थाचे अतिसेवन आरोग्यासाठी धोकादायक आहे.

राजीव कासले | Updated: Aug 14, 2024, 10:00 PM IST
रस्त्यावर व्हेज मंच्युरिअन खाताय, सावधान... सत्य कळल्यावर हादराल title=
संग्रहित फोटो

Gobi Manchurian Ban: युवा पिढित जंक फू़डबरोबरच चायनिज फूडचीही प्रचंड क्रेझ आहे. फ्राईड राईस, ट्रीपल सेजवान राईस, व्हेज/चिकन मंच्युरिअन आणि मनचाऊ सूप हे तरुणांचे आवडते पदार्थ. तरुण पिढीची ही आवड लक्षात घेऊन चायनिज हॉटेल आणि गाड्यांची संख्या वाढली आहे. रस्तो रस्ती चायनिजच्या गाड्या आणि त्याभोवती तरुणांची गर्दी हे नेहमीचच चित्र बनलं आहे. शहरातच नाही तर अगदी ग्रामीण भागातही चायनिजच्या गाड्या सर्रास दिसून येतात.  रस्त्यावरचे हे चायनिज पदार्थ सहज आणि स्वस्तात उपलब्ध असल्यामुळे तेच खाण्याकडे बहुतेकांचा कल असतो. पण हॉटेल्स आणि रेस्टॉरन्टच्या तुलनेत हे पदार्थ स्वस्तात द्यायचे म्हटलं की त्यात अनेक तडजोडी केल्या जातात. यसाठी निकृष्ट दर्जाचे तेल आणि भाज्या वापरल्या जातात.

व्हेज मंच्युरिअनमध्ये सिंथेटिक रंगाचा वापर
गोभी मंच्युरिअनमध्ये सिंथिटेक रंगाचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. या पदार्थाचा रंग जास्त लालभडक दिसावा आणि चटकदार दिसावा यासाठी सिंथेटिक रंग मिसळला जातो. सिंथेटिक रंग आरोग्यासाठी नुकसानकारक आहे. धक्कादायक म्हणजे गोभी मंच्युरिअनसाठी जो सॉस वापरला जातो. तो बनवण्यासाठी चक्क वॉशिंग पावडरचा वापर केला जातो.

चटणी आणि स्वच्छेतवरही प्रश्न
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रस्त्यावरेच पदार्थ खाताना कोणतीही स्वच्छता बाळगली जात नाही. चायनिज पदार्थ बनवण्यासाठी वापरली जाणारी भांडी आणि खराटाही किळसवाणी असतात. याशिवाय चायनिज पदार्थांसाठी वापरली जाणारी चटणी, पाणी आणि तेलही दुय्यम दर्जाचं असतं. अनेकवेळा गोबी मंच्युरिअन बनवण्यासाठी सडक्या कोबीचा वापर केला जातो. त्यासोबत दिली जाणारी चटणीही खराब दर्जाची असते. अन्न आणि औषध प्रशासनकडून अनेकवेळा रस्त्यावरच्या चायनिज गाड्यावंर छापे टाकलेत. या छाप्यातच गोभी मंच्युरिअनसाठी सिंथेटिक रंगाचा वापर केला जात असल्याचं समोर आलं आहे. 

गोव्यात व्हेज मंच्युरिअनवर बंदी
चायनिज पदार्थांमध्ये सर्वांचा आवडता पदार्थ म्हणजे गोबी मंच्युरिअन. पण हाच पदार्ण आरोग्यासाठी सर्वाधिक धोकादायक आहे. गोव्यात म्हापसा शहरात गोबी मंच्युरिअन विक्रीवर बंदी आणण्यात आली आहे. यापुढे म्हापसा (Goa Mhapsa) शहरातील कोणत्याही हॉटेलमध्ये किंवा रस्त्यावर गोबी मंच्युरिअन विकता येणार नाही. 

म्हापसा शहराचे आमदार तारख अरोलकर गोबी मंच्युरिअनवर बंदी आणण्याची सूचना केली होती. यावर इतर आमदारांनीही सहमती दर्शवली. त्यानंतर एकमताने या डिशवर बंदी घालण्यात आली. पण ही पहिलीच वेळ नाहीए. याआधी 2022 मध्ये गोभी मंच्युरिअनवर बंदी घालण्यात आली होती.