मुंबई : केळं खाल्ल्याने वजन वाढतं असा अनेकांचा समज आहे. यामुळेच अनेक महिला केळी खात नाही. मात्र तुम्हाला माहितीये का केळं खाणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतं. यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असून त्यात नैसर्गिकरित्या सुक्रोज आणि फ्रुक्टोज असते. त्यामुळे महिलांनी आहारात याचा समावेश करावा.
मात्र एका गोष्ट महिलांनी लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे एकदम पिवळं केळ तुम्ही खाणं टाळलं पाहिजे. कारण पिकलेल्या केळ्यामध्ये केमिकलंही पिकलेलं असतं. केळं कच्चं असताना त्याचा रंग हिरवा असतो. त्यावेळी त्यावर काळे डाग दिसून येत नाहीत. पिकल्यानंतर त्यावर काही प्रमाणात काळे डाग दिसतात. आणि अशीच केळी खाण्यासाठी हेल्दी असतात.
पिकलेल्या केळ्यामध्ये Tumor Necrosis Factor भरपूर प्रमाणात असतं. हे शरीरातील कॅन्सरच्या असामान्य पेशींशी लढण्यास मदत करत. यामध्ये अँटीऑक्सिंडंट असून इम्यूनिटी वाढवण्यासाठी आणि रक्ताच्या पेशींची संख्या वाढवण्यासाठी मदत होते.
केळी खाण्याचे फायदे
केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं आणि ते नियमितपणे मलविसर्जन करण्यास मदत करतात.
केळ्यामध्ये सोडियमचं प्रमाण असतं जे हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करतं.
केळं नरम असल्याने त्याचं सेवन केल्यानंतर पोटातील जळजळ कमी होते.
ताप आलेल्या व्यक्तीने केळ्याचं सेवन केलं तर शरीराचं तापमान नियंत्रित करण्यास मदत होते.
केळ्यामध्ये असणारं ट्रिप्टोफॅन हा घटक तुमचं डोकं शांत करण्यास मदत करतो.