अंडी खाल्ल्याने Cholesterol वाढते की नाही? जाणून घ्या Egg चा आरोग्यावर कसा होतो परिणाम

Eggs And Cholesterol : तुम्ही अंडी खात आहात का? अंडे खाण्यामुळे आरोग्यावर काय परिमाण होतात, हे तुम्हाला माहित आहे का? अनेकवेळा असे सांगितले जाते की अंडे आणि कोलेस्टेरॉलचा काही संबंध आहे का? 

Updated: Jun 13, 2023, 01:03 PM IST
अंडी खाल्ल्याने Cholesterol वाढते की नाही? जाणून घ्या Egg चा आरोग्यावर कसा होतो परिणाम  title=
Eggs And Cholesterol

Eggs And Cholesterol : आपल्यापैकी अनेकांना अंडी खायला आवड असतात. परंतु यामुळे आपल्या रक्तातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते का? याबाबत अनेकांच्या मनात शंका असते. आपलेला अनेकदा न्याहारीमध्ये उकडलेले अंडे खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण यात प्रोटीन जास्त असतात. प्रत्येक हेल्थ एक्सपर्ट हे सुपरफूड खाण्याचा सल्ला देतात, पण आता प्रश्न असा पडतो की ज्या लोकांचे कोलेस्ट्रॉल लेव्हल आधीच जास्त आहे, त्यांनी अंडी खावीत का आणि किती प्रमाणात याचे सेवन करावे?

खरचं अंड्यांमुळे कोलेस्ट्रॉल वाढते ?

आपण सकाळी नाश्तासोबत अंडी खाण्यास प्राधान्य देत असतो. किंवा आम्लेट खातो. अनेक संशोधनांमध्ये हे सिद्ध झाले आहे की अंड्यांमध्ये चांगले कोलेस्टेरॉल असते, जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. या प्रकारचे कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरात निरोगी पेशी तयार करते. यामध्ये सॅच्युरेटेड किंवा ट्रान्स फॅट नसल्यामुळे एलडीएल म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढत नाही. तुम्ही हे लक्षात ठेवावे की ते उकडल्यानंतर खावे, जास्त तेलात किंवा बटरमध्ये शिजवून खाल्ले तर फायद्याऐवजी तोटाच होऊ लागतो. 

किती प्रमाणात अंडी खाल्ली पाहिजेत?

अंडी खाल्ल्याने चांगले कोलेस्ट्रॉल वाढते, त्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकारांपासूनही आपले संरक्षण होते. डायटीशियन आयुषी यादव यांच्या मते, जर तुम्ही दिवसातून दोन अंडी खाल्ले तर ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यापेक्षा जास्त सेवन करायचे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. जे लोक हेवी वर्कआउट करतात त्यांनी जास्त अंडी खाणे आवश्यक आहे. 

 कोलेस्ट्रॉल वाढीला या गोष्टी कारणीभूत...

आपण आपल्या रोजच्या जीवनात असे काही खाद्यपदार्थ खातो, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी झपाट्याने वाढते. अशा परिस्थितीत या गोष्टी टाळा अन्यथा आरोग्याला हानी पोहोचू शकते. 

1. रेड मीट -  जरी हे प्रथिनांचा भरपूर स्रोत आहे, परंतु त्यात चरबी देखील मुबलक प्रमाणात आढळते, म्हणून ते मर्यादित प्रमाणात खा.

2. दूध -  दूध हे आपल्यासाठी पूर्ण अन्न आहे, पण जर तुम्ही फुल फॅट दूध प्यायले तर कोलेस्ट्रॉल वाढू शकते, तुम्ही क्रीम काढून टाकल्यानंतर त्याचे सेवन करावे.

3. तेलकट पदार्थ -  अनेक स्वयंपाकातील तेल हे आपल्या आरोग्याचे शत्रू आहेत यात शंका नाही. जास्त प्रमाणात सेवन केल्यास अनेक आजाराला निमंत्रण देते.

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)