अनेक दिवसांच्या गॅपनंतर व्यायाम करताय? मग ही गोष्ट फॉलो करा

आपल्यापैकी अनेकजण व्यायाम करतात मात्र यावेळी मध्येच काही दिवसांचा गॅप घेतात.

Updated: Apr 3, 2022, 02:17 PM IST
अनेक दिवसांच्या गॅपनंतर व्यायाम करताय? मग ही गोष्ट फॉलो करा title=

मुंबई : आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाने फीटनेसकडे लक्ष दिलं पाहिजे असं डॉक्टर आपल्याला नेहमी सांगतात. कोरोनानंतर अनेकजण त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देतायत. निरोगी आरोग्यासाठी व्यायाम करणं फार गरजेचं आहे. आपल्यापैकी अनेकजण व्यायाम करतात मात्र यावेळी मध्येच काही दिवसांचा गॅप घेतात. 

योग्य पद्धतीने केलेला व्यायाम तुमच्या शरीरासाठी अत्यंत लाभदायी ठकतो. नियमित व्यायाम केल्यानं आरोग्य उत्तम राहतं. शरीर तंदुरुस्त राहण्यासोबतच रोग प्रतिकारशक्ती देखील वाढतं.

नियमित व्यायाम करताना अशा काही अडचणी निर्माण होतात. ज्यामुळं थोडा ब्रेक घ्यावा लागू शकतो. तुम्ही देखील अनेक दिवसांच्या ब्रेकनंतर व्यायाम सुरू करणार असाल तर काही बाबींची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

योगासनं करा

अनेक दिवसांच्या गॅपनंतर तुम्ही व्यायाम सुरू करणार असाल तर त्याआधी योगसनांनी सुरुवात करा. सुरुवातीलाच कठीण व्यायाम करायला गेल्यास तुम्हाला त्याचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असं करणं टाळा

त्याचप्रमाणे जर तुम्ही योगासनं न करता व्यायाम करण्यास सुरुवात केली तर त्यामुळे लवकर थकवा येण्याची शक्यता अधिक असते. अनेक दिवसांच्या ब्रेकनंतर व्यायाम सुरु करताना सुरुवातीला 5 मिनिटांचा व्यायाम करावा. यानंतर दररोज हळूहळू व्यायामाची वेळ वाढवा.