Bone Care : हाडे मजबूत करतात अंजीर, जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत

हाडे मजबूत करायची असतील तर अंजीरचे सेवन करा. पण नक्की कसे ते जाणून घ्या.

Updated: May 3, 2022, 07:58 PM IST
Bone Care : हाडे मजबूत करतात अंजीर, जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत title=

Bone Care : हाडे मजबूत (Strong bones) असणं खूप गरजेचं असतं. यासाठी कॅल्शियम असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश असणं महत्त्वाचं असतं. यासाठी अंजीर खूप फायदेशीर आहे. हाडे सहज मजबूत होण्यासाठी अनेक गोष्टी आहेत. ज्याची आज आपण माहिती घेणार आहोत. 

तुम्ही जर अंजीराचे सेवन केले तर तुम्हाला त्याचा परिणाम लवकरच दिसून येईल. अंजीरमध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचेही काम करते. यासोबतच अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजेही यामध्ये आढळतात. हाडे मजबूत करण्यासाठी अंजीराचे सेवन कसे करावे, ज्यामुळे त्याचा परिणाम लवकरच दिसून येतो.

अंजीर भिजवून खाण्याचे फायदे (Benefits of eating soaked figs)

भिजवलेले अंजीर खूप फायदेशीर आहेत. यातून तुम्हाला अधिक फायदा होईल. हाडे मजबूत करण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे.

भिजवलेले अंजीर खाल्ल्याने लवकर परिणाम दिसून येतो. ज्यांची हाडे वेळेआधी कमकुवत होत आहेत, ते अंजीरचे सेवन करू शकतात.

भिजवलेले अंजीर निरोगी हृदयासाठी खूप फायदेशीर आहे. अंजीर खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित राहते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.

पचनसंस्थेच्या समस्याही अंजीरच्या सेवनाने दूर होतात. अंजीरमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पोटाशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या दूर होते.

ज्यांच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे त्यांनी अंजीरचे सेवन करावे. यामुळे शरीरातील अशक्तपणा देखील दूर होतो.