धूम्रपानाची सवय सोडायची आहे...तर हे पदार्थ दररोज खा

धूम्रपानाची सवय सोडण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. मात्र घरातीलच काही उपायांनी तुम्ही धूम्रपानाची सवय सोडू शकतात.

Updated: Jun 3, 2017, 08:28 PM IST
धूम्रपानाची सवय सोडायची आहे...तर हे पदार्थ दररोज खा title=

मुंबई : धूम्रपानाची सवय सोडण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. मात्र घरातीलच काही उपायांनी तुम्ही धूम्रपानाची सवय सोडू शकतात.

ओट्स - ओट्सच्या सेवनाने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. त्यामुळे सकाळी उठून ओट्सचे सेवन करा.

मध - मधामध्ये व्हिटामिन्स, एंझाईम्स आणि प्रोटीन्स असतात. धूम्रपानाची सवय सोडणाऱ्यांनी दररोज मधाचे सेवन करावे.  

मुळा - मुळ्याचे सेवन मोठ्या प्रमाणात धूम्रपान करणाऱ्यांसाठी फायद्याचे आहे. मुळ्याचे सेवन मधासोबत केल्याचा अधिक फायदा होतो.

ज्येष्ठमध - ज्येष्ठमधाचे नियमित सेवन केल्याने धूम्रपानाची सवय कमी होते.