Glowing Skin : चेहऱ्याचा रंग बदलेल या 1 खास गोष्टीमुळे, डाग आणि सुरकुत्या जातील आणि त्वचेला येईल ग्लो

Tips for glowing skin : आपला चेहरा नेहमी टवटवीत ठेवण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात. काही समस्यांमुळे, अनेक मुली आणि महिलांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आणि डाग पडतात. त्यामुळे त्यांचे चमकदार त्वचेचे स्वप्न अपूर्ण राहते. मात्र, एक घरगुती उपाय केला तर तुमच्या चेहऱ्याची त्वजा तजेलदार होईल.

Updated: Feb 23, 2023, 08:16 AM IST
Glowing Skin : चेहऱ्याचा रंग बदलेल  या 1 खास गोष्टीमुळे, डाग आणि सुरकुत्या जातील आणि त्वचेला येईल ग्लो title=

Tips for glowing skin : प्रत्येक जण चेहरा चांगला राहण्यासाठी प्रयत्न करत असतो. (Skin Care) काहींच्या चेहऱ्यावर डाग आणि सुरकत्या पडलेल्या दिसतात. (Health News) त्यामुळे त्यांच्या मनात न्यूनगंड असतो. आता तुमची चेहऱ्याची त्वचा मुलायम आणि चांगली दिसण्यासाठी एक घरगुती उपाय करु शकता. त्यामुळे तुमची त्वचा टवटवीत राहिल आणि चेहरा ही चांगला दिसेल. या उपयाबाबत तुम्ही अधिक जाणून घ्या.

महिला असे की पुरुष, प्रत्येकालाच सुंदर आणि चमकणारा चेहरा हवा असतो. जर तुम्हाला या सर्व समस्या दूर करुन सुंदर आणि चमकणारा चेहरा दिसायला हवा असेल तर तुम्ही हा घरगुती उपाय करुन तो मिळवू शकता. चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी पपईच्या बिया खूप गुणकारी आहेत. पपई खाल्ल्याने आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होतो, त्याचप्रकारे त्याच्या बिया चेहऱ्याचा रंग बदलतात. चेहऱ्याच्या त्वचेसाठी पपईच्या बिया कशा फायदेशीर आहेत, ते जाणून घ्या.

पपईच्या बियांमध्ये पेपीन नावाचा घटक आढळतो, ज्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात. चेहऱ्यावर नियमितपणे लावल्याने मृत त्वचा निघून जाते आणि त्वचेच्या मृत पेशी ठिक होतात. त्वचा क्रियाशील होते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये अँटी-एजिंग, अँटी-ऑक्सिडंट सारखे घटक आढळतात, जे त्वचा वर्षानुवर्षे तरुण ठेवतात आणि चेहरा उजळण्यास मदत करतात. पपईच्या बियांचा फेस मास्क करा आणि तो चेहऱ्याला लावा. हा फेस मास्क कसा तयार करायचा ते जाणून घ्या.

पपईने फेस मास्क बनवण्याची पद्धत

एका भांड्यात 1 चमचे पपईच्या बिया टाका. नंतर त्यात एक चमचा खोबरेल तेल आणि एक चमचा मध टाका. या सर्व गोष्टी नीट मिसळा आणि नंतर त्यात व्हिटॅमिन सीच्या दोन कॅप्सूल घाला. हे सर्व मिश्रण मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकून चांगले बारीक करुन घ्या. लक्षात ठेवा की एक घट्ट मिश्रण तयार केले पाहिजे. आता तुमचा फेस मास्क तयार आहे.

पपईचा फेस मास्क चेहऱ्यावर कसा लावायचा?

ब्रशच्या मदतीने तयार केलेला पपई फेस मास्क चेहऱ्यावर लावा. मग हळूहळू मास्क चेहऱ्यावर चांगला पसरवा. नंतर 15-20 मिनिटे हा फेस मास्क सुकल्यावर, साध्या पाण्याने चेहरा धुवा. यानंतर चेहऱ्यावर खोबरेल तेल लावा. पाहा आता  तुमचा चेहला टवटवीत आणि ग्लो आलेला दिसेल.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)