मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 978 रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी दोघांचा मृत्यू झाला. मोठी बाब म्हणजे मुंबईत पाच दिवसांनंतर एक हजारांहून कमी प्रकरणं दाखल समोर आली आहेत. गुरुवारी शहरात 1265 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. म्हणजेच शनिवारी दैनंदिन प्रकरणांमध्ये 22.6 टक्क्यांनी घट झालीये.
बीएसएमसीने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत आतापर्यंत 11 लाख 13 हजार 470 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, संसर्गामुळे आतापर्यंत 19 हजार 612 लोकांचा मृत्यू झालाय. मुंबईत एक्टिव्ह रुग्णांची संख्याही 10 हजारांच्या खाली आलीये. शहरात आता कोरोनाचे 9 हजार 710 एक्टिव्ह रुग्ण आहेत.
अधिकृत आकडेवारीनुसार, शहरात जूनमध्ये कोरोनाचे 45 हजार 619 रुग्ण आणि 44 मृत्यूची नोंद झाली आहे. तर मे महिन्यात 5979 रुग्ण आणि 3न मृत्यूची नोंद झाली आहे.
नवीन प्रकरणांमध्ये घट झाल्याने, आता पॉझिटीव्हीटी रेट 9.9 टक्क्यांवरून 7.8 टक्क्यांवर आला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1896 रुग्ण बरे झाले असून, त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या 10 लाख 84 हजार 148 वर पोहोचली आहे. आता शहरातील रिकवरी रेट 97 टक्के आहे.