Workout: सावधान! जीममध्ये वर्कआऊट करताना 'या' पाच चुका टाळा... नाहीतर होईल उलटा परिणाम

Work Out News: आपल्या सगळ्याच्या जीवनशैलीत आता खूप बदल होत आहेत. त्यातून फिटनेस हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा झाला आहे. 

Updated: Jan 22, 2023, 01:09 PM IST
Workout: सावधान! जीममध्ये वर्कआऊट करताना 'या' पाच चुका टाळा... नाहीतर होईल उलटा परिणाम  title=

Work Out News: आपल्या सगळ्याच्या जीवनशैलीत आता खूप बदल होत आहेत. त्यातून फिटनेस (Fitness) हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा झाला आहे. आपल्या दैंनदिन जीवनात आपण फिटनेसला खूप महत्त्व देत आहोत. त्यातून नोकरी आणि फिटनेस याचा बलॅन्सही (Work Life Balance) आपण आपल्या आयुष्यात ठेवू लागलो आहोत. लोकांना फिटनेस आणि आरोग्याचे महत्त्वही कळू लागले आहे. त्यामुळे जिम करण्यावर तरूणांचा भर वाढतो आहे. परंतु अनेकदा असं होतं की, जिम किंवा वर्कआऊट करतानाही अनेकांच्या चुका होतात. त्यामुळे आपल्याला कळतंही नाही की आपल्याला नक्की कसं आणि कितीवेळ वर्कआऊट (Mistakes at Workout) करायचे आहे. तेव्हा या लेखातून आपण जाणून घेऊया की, नक्की आपल्याला कसं आणि कशापद्धतीनं कोणत्याही चुका न करता वर्कआऊट जिममध्ये कशा कराव्यात. (gym workout avoid these mistakes while doing workout for weight loss otherwise you can face major difficulties)

मुख्यत्वे लोकांना आपलं वजन कमी करायचे असते. त्यामुळे लोकं हे जिममध्ये वर्कआऊट करण्याच्या मागे जातात. परंतु कितीही आणि कसेही प्रयत्न केले तरी त्यांचे वजव काही कमी होत नाही. त्यामुळे त्यांना अनेकदा संकटांना सामोरे जावे लागते. चांगलं वर्कआऊट करूनही (Workout for Weight Loss) अनेकदा आपलं वजन कमी होत नाही. त्यातून काय उपाय करावा हेही कळत नाही. तेव्हा वर्कआऊट करताना अशाच काही चुका राहून जातात ज्यामुळे आपल्यालाही त्याचा वेगळाच त्रास सहन करावा लागतो. 

आपलं वजन कमी करण्यासाठी लोकं कार्डिओ एक्सरसाईजवर (Cardio Excercise) भर देतात परंतु तेवढेच महत्त्वाचे नसते त्यासाठी तुम्हाला स्ट्रेंथ ट्रेनिंग (Strenth Training) घेणंही महत्त्वाचं आहे. काही लोकांची एक कॉमन चूक होते आणि ती म्हणजे त्यांना लवकरच बारीक व्हायचं असतं. त्यासाठी ते जोरजोरात व्यायाम नाहीतर एक्सरसाईज करण्याच्या मागे लागतात. तेव्हा त्यांना काही करून लवकरात लवकर बारिक व्हायचे असते. त्यामुळे शरीरावर ताण येईपर्यंत ही मंडळी एक्सरसाईज करत असतात परंतु हे लक्षात घ्या की, असं केल्यानं तुमच्या मसल्स आणि हाडांवर ताण येऊ शकतो आणि त्यानं तुम्हाला फ्रॅक्चरही होऊ शकते तेव्हा अशा वेळी आपल्या फिटनेस ट्रेनरचा सल्ला घ्या. 

हेही वाचा - Saffron : पाण्यात केशर मिसळून प्यायल्यास शरीरावर काय परिणाम होतात? जाणून घ्या

काहींना असे वाटते की 15 मिनिटे व्यायाम (Execerise Time) केल्यानं त्यांची समस्या कमी होऊ शकते परंतु तसे नाही. तुम्हाला निदान 40-45 मिनिटे तरी वर्कआऊट करणं म्हत्त्वाचं आहे. त्याचबरोबर हेही लक्षात ठेवणं गरजेचे आहे की, फक्त वर्कआऊट करून तुमचं वजन कमी होणार नाही तर तुम्ही तुमच्या आहारात पण किती कॅलरीज (Calories) ठेवत आहात याकडेही लक्ष देणे म्हत्त्वाचे आहे. एक लक्षात ठेवणे इथे म्हत्त्वाचे ठरेल की, तुम्ही जर प्रमाणापेक्षा जास्त प्रोटीन (Protein) घेतलंत तर तुम्हाला त्याचा उलटा परिणाम जाणवेल. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)