मुंबई : शरीराची काळजी घेणं आणि शरीराला टॉक्सिन फ्री ठेवण्यात यकृताची किंवा लिवरची फार महत्त्वाची भूमिका असते. लिवरची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, ते आपोआप खराब झालेल्या पेशींना रिप्लेस करतात. परंतु एका टप्प्यावर पोहोचल्यानंतर, लिवरची ही क्षमता संपुष्टात येऊ लागते. विशेषतः जेव्हा आपण सतत त्याला नुकसान होईल अशा गोष्टींची सवय लावून घेतो, तेव्हा त्याचं जास्त नुकसान होतं. परंतु बऱ्याच लोकांना लिवरचं महत्व किंवा त्याचं काम माहित नसत, ज्यामुळे त्या अशा काही सवयी स्वत:ला लावून घेतात. जे त्यांच्या शरीराचं नुकसान करातात. याच कारणामुळे लोकांमध्ये लिवरच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 19 एप्रिल रोजी जागतिक लिवर दिन साजरा केला जातो.
आज आम्ही तुम्हाला अशाच काही वाईट सवयींबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे आपलं Liver लवकर खराब होतं.
तोंडाद्वारे शरीरात जाणारे औषधे, औषधी वनस्पती आणि पूरक पदार्थ हे सगळं लिवरमधून जातं. त्यामुळे या सगळ्या पदार्थांवर लिवरला जास्त काम करावं लागतं. परंतु अती औषध खाण्याच्या तुमच्या या चुकीमुळे लिवर निकामी होऊ शकतं.
चांगली झोप न घेणे हे देखील आपल्या लिवरसाठी खूप हानिकारक ठरू शकते. एका अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, एखाद्या व्यक्तीच्या खराब झोपेमुळे लिवरवर ऑक्सिडेटिव्ह ताण येऊ शकतो. म्हणूनच डॉक्टर लोकांना दिवसातून सुमारे 8 तास झोपण्याचा सल्ला देतात.
खाण्याच्या चुकीच्या सवयी देखील काही काळानंतर आपले लिवर खराब करू लागतात. जास्त कॅलरी असलेले अन्न, ट्रान्स फॅट, सॅच्युरेटेड फॅट आणि साखर यासारख्या गोष्टींच्या अतिसेवनामुळे आपल्या लिवरवर चरबी जमा होऊ लागते. लठ्ठपणाचा त्रास असलेल्या लोकांमध्ये ही समस्या अधिक दिसून येते. त्यामुळे लठ्ठपणासोबतच खाण्याच्या वाईट सवयींवरही नियंत्रण ठेवा.
आपल्या शरीराला व्हिटॅमिन एची खूप गरज असते. यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणजे ताजी फळे आणि भाज्या. यामध्ये लाल, केशरी आणि पिवळ्या रंगाची फळे आणि भाज्या अधिक फायदेशीर मानल्या जातात.
परंतु जर तुम्ही व्हिटॅमिन-ए चा उच्च डोस झाला किंवा या संदर्भात सप्लिमेंट घेतले, तर ते तुमच्या लिवरसाठी घातक ठरू शकतं. म्हणून, ते घेण्यापूर्वी, कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या.
दारू किंवा सिगारेटची वाईट सवय तुमच्या लिवरलाही नुकसान पोहोचवू शकते. वास्तविक, अल्कोहोल आणि तंबाखू लिवरमधील विष काढून टाकण्याच्या क्षमतेवर परिणाम करतात. अलीकडील अभ्यासानुसार, जे लोक दिवसातून तीन ग्लास वाइन पितात त्यांना लिवरचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते.