मुंबई : दात चमकदार असतील तर सहाजिकच तुमचा आत्मविश्वास वाढतो. मात्र आपल्या काही सवयींमुळेच दातांचा पिवळेपणा वाढणं, तोंडाला दुर्गंधी येणं, हिरड्यांमधून रक्त येणं अशा समस्या वाढतात. दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी अनेक घरगुती उपाय उपलब्ध आहेत. मग तुम्हांलाही चमकदार दात ठेवायचे असतील तर काही चूका टाळणं फायदेशीर ठरते.
तोंडांचं आरोग्य जपण्यासाठी ब्रश करणं आवश्यक आहे. मात्र जोराजोरात ब्रश करणं आरोग्याला फायदेशीर आहे. मात्र यामुळे दातांचे नुकसान होऊ शकते.
जेवल्यानंतर लगेजच दात स्वच्छ करणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे असे तुम्हांला वाटत असेल परंतू जेवणानंतर लगेज ब्रश केल्याने दातांवरील अॅसिड निघून जाते परिणामी इनॅमल खराब होण्याची शक्यता असते. म्हणूनच जेवणानंतर 30-40 मिनिटांनी ब्रश करावा.
नियमित ब्रश करण्यासोबतच फ्लॉस करण्याची अनेकांना सवय असते. डेंटल फ्लॉसमुळे दातंमधील हानीकारक बॅक्टेरिया नष्ट होतात.
अतिगोड खाण्याची सवयही दातांचे आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरतात. गोड खाण्यामुळे दातांवर अॅसिड जमा होते. अशाप्रकारे असिड अधिक काळ टिकून राहिल्यास हिरड्या आणि दातांचे नुकसान होते.
उन्हाळ्याच्या दिवसात शरीर थंड ठेवण्यासाठी अनेक 'कूल' ड्रिंक्सचा वापर केला जातो. मात्र बर्फ चावून खाणं दाताला त्रासदायक आहे. यामुळे इनॅमल खराब होते. अति थंड तापमानदेखील तोंडाच्या आरोग्याला त्रासदायक आहे.
दातांच्या आरोग्यासाठि ब्रशची योग्य निवड करणंदेखील आवश्यक आहे. एक ब्रश 3 महिन्यांपेक्षा अधिक काळ वापरू नका. तसेच नियमित वापरत असलेला ब्रशदेखील स्वच्छ करणं आवश्यक आहे.