Hair Tips: आपल्या केसांची चांगली काळजी घेतली जावी असे आपल्याला कायमच वाटतं असतं. किंबहूना आपलं केस हे किती अमूल्य आहेत. तेव्हा त्यांची निगा राखण्यासाठी आपण एक नाही तर शंभर उपाय (hair care tips) करत असतो. अगदी घरगुती तर कधी ब्यूटी पार्लरमध्ये (beauty parlour) जाऊन आपण हेअर ट्रीटमेंट घेत असतो त्यामुळे आपल्याला ही एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की ब्यूटी पार्लरपेक्षाही तुम्ही घरगुती उपयांचा अवलंब करू शकता. यामुळे तुमचा वेळ, खर्च दोन्हीही गोष्टी वाचतात. चला तर मग जाणून घेऊया की असे कोणते घरगुती उपाय आहेत ज्यानं तुम्ही लांबसडक आणि काळेभोर केस मिळवू शकता. (hair care tips for woman these are the helpful tips for hair use the home made mehendi)
लांब आणि सुंदर केस ही प्रत्येक स्त्रीची इच्छा असते परंतु जर तुमची वाढ खूपच कमी होत असेल तर तुम्हाला तुमच्या केसांकडे लक्ष देणे आवश्यक होते. अशावेळी मेंदी तुम्हाला मदत करू शकते. होय, केस निरोगी आणि लवकर वाढवण्यासाठी तुम्ही मेंदी वापरू शकता. केसांना मेंदी लावल्याने केस लवकर वाढतात (strong and smooth hair) आणि मजबूतही होतात. पण यासाठी केसांना मेंदी लावण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहित असली पाहिजे.
1 स्काल्पचे (scalp) आरोग्य चांगले राहते.
2 पीएच (ph) पातळी संतुलित करण्यास मदत करते.
3 केस (hair) गळण्याची समस्या दूर होते.
4 केस दुरुस्त राहतात.
5 केसांना ताकद द्या.
6 केस चमकदार आणि मजबूत आहेत.
हेही वाचा - GST Scam: आताची मोठी बातमी! GST विभागाकडून 500 कोटींचा घोटाळा उघड
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी (vitamin C), लोह (Iron) आणि कॅरोटीन (Keratin) आढळतात ज्यामुळे केसांची वाढ वाढण्यास मदत होते. त्यामुळे केस लवकर वाढतात. हा पॅक (hair pack) बनवण्यासाठी कोमट पाण्यात मेंदी (mehndi) मिक्स करा. मेहंदीचे मिश्रण घट्ट होईपर्यंत 10 तास बाजूला ठेवा. यामुळे मेहंदीचा रंग सुधारतो. आता मेंदीमध्ये गुसबेरी (gooseberry) पावडर मिसळा आणि थोडा वेळ बाजूला ठेवा. यानंतर केसांना मेंदी लावा आणि 2 तासांनी केस पाण्याने धुवा. केस कोरडे झाल्यावर केसांना तेल (oil) लावा आणि नंतर दुसऱ्या दिवशी शॅम्पूने (shampoo) धुवा.
केसांच्या वाढीसाठी कोरफड आणि मेंदीचा वापर करा. हे केसांना कंडिशनर (conditioner) करण्याचे काम करते. ते लावण्यासाठी मेंदीमध्ये एलोवेरा जेल मिक्स करून काही वेळ बाजूला ठेवा.आता हे मिश्रण ब्रशच्या मदतीने केसांना लावा.एक तासानंतर केस धुवा.