मनुका या पद्धतीने खाल्ल्यास पुरुषांना होतील हे फायदे

मनुके खाणे शरीरासाठी नेहमीच चांगले असते. मात्र मनुका खाल्ल्यानंतर त्यावर कोमट पाणी प्यायले तर ते पुरुषांच्या आरोग्यासाठी चांगले असते. हे सतत सात दिवस केल्यानंतर शरीरातील फरक नक्कीच जाणवतील. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Nov 27, 2017, 10:48 PM IST
मनुका या पद्धतीने खाल्ल्यास पुरुषांना होतील हे फायदे title=

मुंबई : मनुके खाणे शरीरासाठी नेहमीच चांगले असते. मात्र मनुका खाल्ल्यानंतर त्यावर कोमट पाणी प्यायले तर ते पुरुषांच्या आरोग्यासाठी चांगले असते. हे सतत सात दिवस केल्यानंतर शरीरातील फरक नक्कीच जाणवतील. 

या पद्धतीने खाल्ल्यास होतील अनेक फायदे

रोज सकाळी उठून ५ मनुके खा त्यावर कोमट पाणी प्या. मनुकामध्ये आयर्न, सेलेनियम असते. ज्यामुळे स्टॅमिना वाढतो. यात अमिनो अॅसिड असते. यातील आर्जनिनमुळे इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास दूर होतो. 

यातील अमिनो अॅसिडमुळे स्पर्म काऊंट वाढतो. तसेच फर्टिलिटीशी संबंधित समस्यांपासून बचाव होतो.