मुंबई : अनेकदा आजारी असताना किंवा थकवा जाणवत असेल तर तुम्हांला आईने पेज प्यायला दिली असेल. मात्र पेज हे केवळ आजारपणातले जेवण नाही. नियमित धावपळीच्या दिवसांतदेखील झटपट आणि हेल्दी नाश्ता म्हणून पेजेचा नक्कीच आहारात समावेश करू शकता. शरीराला उर्जा मिळते – भाताच्या पेजेमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण मुबलक असते. त्यामुळे शरीराला उर्जा मिळण्यास मदत होते.
तांदळाच्या पेजेमध्ये काळे मीठ टाकून प्यायल्याने भूक वाढते
तांदळाच्या पेजेमध्ये मध मिसळून प्यायल्याने एनर्जी मिळते. थकवा दूर होतो.
तांदळाच्या पेजेमध्ये ताक मिसळून प्यायल्याने बॉडीमधून पाण्याची कमतरता दूर होते.
तांदळाच्या पेजेमध्ये लिंबूचा रस टाकल्याने पोटाच्या समस्या दूर होतात.
तांदळाची पेज आणि गूळ एकत्रित प्यायल्याने रक्ताची कमतरता दूर होते.
तांदळाच्या पेजेमध्ये दूध आणि साखर टाकून प्यायल्याने हाडे मजबूत होतात.
दही टाकून तांदळाची पेज प्यायल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.
केळे आणि तांदळाची पेज एकत्र करुन प्यायल्याने डायरियाचा प्रॉब्लेम दूर होतो.
तांदळाच्या पेजेमध्ये तूप मिसळून प्यायल्याने वजन वाढवण्यास मदत मिळते.
तांदळाच्या पेजेमध्ये मीठ आणि जिरे मिसळून प्यायल्यास डायजेशन सुधारते.