डोळे मिचकवण्याचे 5 आरोग्यदायी फायदे

आजकल जेवताना, बोलताना आणि अगदी चालता फिरताही हातात सतत लक्ष स्मार्टफोनवर खिळलेलं असतं.

Updated: Aug 6, 2018, 08:16 PM IST
डोळे मिचकवण्याचे 5 आरोग्यदायी फायदे  title=

मुंबई : आजकल जेवताना, बोलताना आणि अगदी चालता फिरताही हातात सतत लक्ष स्मार्टफोनवर खिळलेलं असतं. सतत इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या संपर्कात असल्याने डोळ्यांवर त्याचा ताण येतो. कळत नअकळत आपण डोळ्यांचं आरोग्य धोक्यात आणत असतो. अशावेळेस डोळे मिचवणं हा डोळ्यावरील नकळत वाढणारा ताण हलका करण्याचा एक उपाय आहे. 

डोळे मिचकवण्याचे फायदे -  

1. मॉईश्चरायझर -  

डोळे मिचकवल्याने डोळ्यांना नव्याने मॉईश्चर मिळण्यास मदत होते. यामुळे डोळ्यांमध्ये शुष्कपणा वाढण्याचा धोका कमी होतो. 

2. डोळ्यांचं आरोग्य सुधारते -  

डोळ्यांमध्ये बाहेरील एखादा घटक, धूळ जाऊ नये म्हणून आपण डोळे मिचकवतो. डोळ्यात काही गेल्यास आपोआपच आपण डोळे मिचकवायला सुरूवात करतो. यामुळे डोळ्यात गेलेला एखादा त्रासदायक घटक बाहेर पडतो. 

3. बॅक्टेरियांचा प्रभाव कमी होतो - 

डोळे मिचकवल्याने धूळ, बॅक्टेरिया बाहेर पडण्यास मदत होते. अनेकदा डोळ्यातून पाणी बाहेर पडतं, त्यातूनच  हे बॅक्टेरियाही बाहेर पडतात. यामुळे डोळे लाल होणं, इंफेक्शनचा धोका बळावतो. 

4. डोळे स्वच्छ होतात - 

डोळे मिचकवल्याने डोळे स्वच्छ होण्यास मदत होते. दृष्टी सुधारते. 

5. डोळ्यांना ऑक्सिजन - 

डोळे मिचकवल्याने ऑक्सिजन मिळण्यास मदत होते. यामधून डोळ्यांना मॉईश्चरायझर मिळण्यासही मदत होते.