मुंबई : दिवसभर उत्साही राहण्यासाठी ‘ब्रेकफास्ट’ फारच आवश्यक आहे. व्यस्त जीवनशैलीमुळे आजकाल बाजारात मिळणार्या रेडी टू मेक नाश्त्याकडे आपण सहज वळतो पण असे पदार्थ खाणे आरोग्यास हितकारी असतीलच असे नाही. मग नाश्त्याला झटपट तयार होणारा आणि आरोग्यासही हितकारी पर्याय म्हणजे ‘पोहे’. भारतात विविध भागांत पोहे बनवण्याची पदधत निरनिराळी आहे. नाश्त्याला चहा चपाती खाण्याची तुम्हांला सवय असेल तर हा सल्ला तुम्हांला नक्कीच वाचायला हवा...
आयर्नचा (लोह) पुरवठा होतो –
पोह्यांमुळे शरीरात आयर्नची कमतरता किंवा अॅनिमिया जडण्याची शक्यता कमी होते. 100 ग्रॅम कच्च्या पोह्यातून शरीराला 20 mg आयर्न मिळते. लहान मुलांप्रमाणेच, गरोदर स्त्रिया तसेच नवमातांनी नाश्त्याला पोहे खाणे हितकारी आहे. आयर्नमुळे हिमोग्लोबिनची निर्मिती सुधारते तसेच रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण सुधारल्याने रोगप्रतिकारशक्तीदेखील सुधारते. पोहे बनवल्यानंतर त्यावर लिंबाचा रस पिळल्यास अधिक चांगल्या प्रकारे आयर्नचे शोषण होण्यास मदत होते.
पोह्यांमध्ये भाज्या घातल्याने त्यातील व्हिटामिन,मिनरल्स व फायबरचे प्रमाण वाढते. आवडीनुसार त्यात मोड आलेली कडधान्य, सोयाबीन,शेंगदाणे किंवा उकडलेले अंड मिसळल्याने त्यात प्रोटीन्सची मात्रा वाढते. पोह्यांची पोषणता वाढण्यासाठी पांढर्या पोह्यांऐवजी लाल पोहे (हातसडीचे) वापरावेत. जरूर वाचा : चहा किंवा कॉफी घेण्यापूर्वी पाणी का प्यावे?
वाटीभर पोह्यातून शरीराला मुबलक प्रमाणात कार्बोहायड्रेट्स मिळतात. त्यामुळे पोहे हा नाश्त्याचा उत्तम पर्याय आहे. कार्बोहायड्रेसमुळे शरीरात उर्जा निर्माण होण्यास मदत होते. त्यामुळे वेळी-अवेळी लागणार्या भूकेवर नियंत्रण मिळवण्यासाठी चिप्स किंवा बिस्कीटं खाण्याऐवजी पोहे फारच आरोग्यदायी आहेत.
ग्ल्युटेनचे प्रमाण वाढू नये म्हणून अनेकजण गहू, बार्ली अशा धान्यांचा आहारातील समावेश कमी करतात. मात्र प्रत्यक्षात या धान्यांमुळे ग्लुटेनच्या प्रमाणात फारसा चढा-उतार होत नाही.
मधुमेहींसाठी पोहे हा अत्यंत पोषक नाश्त्याचा पर्याय आहे. कारण पोह्यांचा आहारात समावेश केल्यास रक्तातील साखर हळूहळू वाढते. तसेच पोटभर पोहे खाल्ल्याने बराच वेळ भूकेवर नियंत्रण मिळवण्यास मदत होते. मधुमेहींनी पोह्यांची पोषकता वाढवण्यासाठी त्यात सोयाचा वापर करावा.
पोह्यांमधील तोच तोचपणा टाळण्यासाठी त्यात प्रत्येकवेळेस काही बदल करा. आवडीनुसार तुम्ही त्यात मांसाहाराचाही समावेश करू शकतात.
भाज्या टाकून केलेले पोहे- 244 Kcal
शेंगदाणे घातलेले पोहे- 589 Kcal