पनीर खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत

मोठ्या प्रमाणात लोकांना पनीर आवडतं. त्याचे कारण म्हणजे,

Updated: Dec 23, 2019, 06:33 PM IST
पनीर खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत  title=

मुंबई : मोठ्या प्रमाणात लोकांना पनीर आवडतं. त्याचे कारण म्हणजे, भारतीय जेवणात पनीरचे वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात. भाज्यांसोबत पराठ्यांमध्ये पनीरचा वेगवेगळ्या प्रकारात समावेश केला जातो. फक्त चवीत नव्हे, तर तुमच्या आरोग्यासाठी पनीर खूप चांगले आहे. कॅल्शियम भरपूर असल्याने, पनीर तुमच्या हाडांसाठी आणि दातांसाठी खूप फायदेशीर आहे. प्रोटीन युक्त पनीर मासपेशींसाठी फायदेशीर आहे. पनीर खाल्याने वजन कमी करायलाही मदत होते.    

पनीर प्रोटीन युक्त आहे. वजन कमी करण्यास मदत होते. हे भूक कमी करणारे हार्मोन्स जीएलपी -१, पीवाइवाई आणि सीसीकेच्या स्तराला वाढवतात. तिथेच भूख वाढवणाऱ्या हार्मोनच्या स्तराला कमी करतात. त्यामुळे डायटिंगला फायदा होतो. मात्र पनीर अतिप्रमाणात खाल्ल्यास वजन वाढू शकतं हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

वजन कमी करण्यात पनीरचे फायदे  

पनीरमध्ये गुड फॅट्स असतात. गुड फॅट्स वजन कमी करण्यात मदत करतात. पनीरमध्ये कार्बोहाइड्रेट कमी प्रमाणात असतात. वजन कमी करण्यासाठी रोजच्या जेवणात लो-कार्ब असणे गरजेचे आहे. पनीरमध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. कॅल्शियम हाडांना आणि दातांना मजबूत बनवतात आणि फॅट्स कमी करतात.