रामफळाचे '4' आरोग्यदायी फायदे

रामफळ हे फळांमध्ये आरोग्यदायी असले तरीही त्याचा आहारात फारसा वापर केला जात नाही.

Updated: Feb 22, 2018, 09:43 PM IST
रामफळाचे '4'  आरोग्यदायी फायदे  title=

मुंबई : रामफळ हे फळांमध्ये आरोग्यदायी असले तरीही त्याचा आहारात फारसा वापर केला जात नाही.

भारतात बाजरपेठांमध्येही उपलब्ध असले तरीही अनेकांनी त्याची अजून एकदाही चव चाखली नसेल. पण आरोग्याच्यादृष्टीने रामफळ अत्यंत गुणकारी असल्याने तुमच्या नजरेस पडल्यास हे फळ नक्की चाखा. पहा आहारतज्ञ ऋजुता दिवेकर यांनी सांगितलेले रामफळाच्या सेवनाचे काही आरोग्यदायी फायदे...

प्री डाएबिटीस / मधूमेहींसाठी फायदेशीर  -  

मधूमेहाचा त्रास म्हटला की आहारावर बंधनं येणार हे अटळ असते. मधूमेहींना अनेकदा मधल्या वेळेत भूक खाल्ल्यास नेमके काय खावे? हा प्रश्न पडलेला असतो. मधूमेहींसाठी रामफळ उत्तम आहे. रामफळाच्या सेवनाने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. सोबच रामफळात अ‍ॅन्टी कॅन्सर क्षमता आहे.  

अ‍ॅक्नेचा त्रास कमी होतो -  

तिशी पार केलेल्यांमध्ये अ‍ॅडल्ट अ‍ॅक्नेचा त्रास असल्यास रामफळ त्यावर उत्तम उपाय आहे. रामफळाच्या सेवनामुळे त्वचेचे आरोग्य सूधारण्यासाठी मदत होते.  

कमजोर रोगप्रतिकारशक्ती  - 

ऋतूमानात बदल झाल्यास तुम्हांला लगेजच त्रास होतो का ? तुमचं उत्तर 'हो' असल्यास यामागील एक कारण म्हणजे कमजोर रोगप्रतिकारशक्ती असू शकते. ती सुधारण्यासाठी रामफळ फायदेशीर ठरू शकते.  रामफळातील व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी घटक फायदेशीर ठरतात. 

शुष्क केसांची समस्या  - 

रामफळातील व्हिटॅमिन सी घटक, फ्री रॅडिकल्सशी सामना करण्याची क्षमता शुष्क केसांची समस्या, अ‍ॅक्ने मार्क्स आणि कमजोर सांध्यांना बळकटी देण्यासाठी मदत करतात.