मुंबई : आरोग्याची काळजी घेताना प्रत्येक गोष्टीवर भर दिला पाहिजे. व्यवस्थित बसले नाहीतर पायातून मुंग्या येतात. त्यामुळे मुंग्या येणे हे लक्षण रक्तपुरठा व्यवस्थित होत नसल्याचे आहे. तसेच तुम्ही कधीही क्रॉस बसू नका. पायावर पाय ठेवून बसल्याने मणक्यावर ताण येतो.
पाय एकमेकांवर ठेवून बसण्याची सवय ही आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. तुम्ही वेळीच सावध व्हा. चुकीच्या पध्दतीने बसल्याने पाठीवरच्या मणक्यावर ताण येतो. भविष्यात याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो.
तुम्ही जेवढा वेळा पायावर पाय ठेवून किंवा क्रॉस बसता तेवढा वेळ पायातील रक्तपुरवठयाचा कमी राहतो. त्यामुळे मांडी घालून बराचवेळ बसल्यानंतर पायात मुंग्या येतात. हे लक्षण तुमचा रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही, हे सांगते.
जर तुमचा रक्त पुरवठा व्यवस्थित झाला नाहीतर थेट मणक्यावर ताण येऊन पाठदुखीचा त्रास सुरु होतो. बसताना सरळ पाय सोडून बसावे. ताठ बसावे. वाकून बसू नये. फार वेळ एकाच स्थितीमध्ये बसू नसे. थोड्या थोड्या वेळाने मध्येच उठावे आणि पाय मोकळे करण्यासाठी थोडे फिरावे, असा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात आलाय.