या फळाच्या बिया शरीरासाठी विषारी, पोटात गेल्यास व्यक्तीचा मृत्यू होण्याची शक्यता

फाळाच्या बिया या तुमच्या शरीरासाठी हानिकारक असल्याचे तुम्हाला सांगितले तर, तुमचा विश्वास बसेल का?

Updated: Nov 17, 2021, 12:38 PM IST
या फळाच्या बिया शरीरासाठी विषारी, पोटात गेल्यास व्यक्तीचा मृत्यू होण्याची शक्यता title=

मुंबई : सफरचंद खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते, परंतु त्याच्या बिया तुमच्या शरीरासाठी हानिकारक असल्याचे तुम्हाला सांगितले तर, तुमचा विश्वास बसेल का? तुम्हाला विश्वास ठेवायला कठीण जात असलं तरी, सफरचंदाच्या बिया तुमच्या शरीरासाठी हानिकारक असू शकतात. सफरचंदाच्या बियांमध्ये अमिग्डालिन नावाची वनस्पती संयुग असते, जे विषारी असू शकते. जेव्हा हा घटक पाचक एन्झाईम्सच्या संपर्कात येतो तेव्हा ते सायनाइड सोडू लागते.

तज्ञांच्या मते, ते इतके हानिकारक असू शकते की, ते खाल्ल्याने तुमचा जीवही जाऊ शकतो. परंतु हे लक्षात घ्या की, तुम्ही चुकून फक्त एक किंवा दोन बिया गिळल्यास, काळजी करु नका ते तुमच्या जिवनासाठी हानिकारक ठरणार नाही, परंतु यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते.

मेडिकल न्यूज टुडे हेल्थ वेबसाइटनुसार, सफरचंदाच्या बियांचे कमी प्रमाणात सेवन केल्याने चक्कर येणे, डोकेदुखी, उलट्या, ओटीपोटात दुखणे आणि अशक्तपणा येऊ शकतो.

सफरचंदाच्या बियांमध्ये असलेले वनस्पती संयुग अमिग्डालिनमध्ये सायनाइड आणि साखर असते. शरीरात प्रवेश केल्यानंतर त्याचे हायड्रोजन सायनाइडमध्ये रूपांतर होते. यातून तुम्ही आजारी तर पडू शकताच पण मृत्यूचाही धोका आहे.

त्याच्या रासायनिक स्वरूपाव्यतिरिक्त, काही फळांच्या बियांमध्ये सायनाइड आढळते. यामध्ये जर्दाळू, चेरी, पीच, प्लम आणि सफरचंद या फळांचा समावेश आहे. या बियांमध्ये एक अतिशय मजबूत लेप असतो जो अमिग्डालिनला आत ठेवतो.

सायनाइडमुळे हृदय आणि मेंदूचे नुकसान होते. त्यामुळे शरीरातील ऑक्सिजनचा पुरवठा विस्कळीत होतो. काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये, एखादी व्यक्ती कोमात जाऊ शकते आणि त्याचा मृत्यू देखील होऊ शकतो. सायनाईडचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास श्वसनाचा त्रास होऊ शकतो.

सफरचंदाच्या बियांच्या विषारी प्रभावामुळे हृदयाचे ठोके वाढतात आणि रक्तदाब कमी होऊ शकतो. यामुळे तुम्ही बेहोशही होऊ शकता. सफरचंदाच्या बिया खाल्ल्यानंतर तुम्ही बरे झालात तरीही त्याचा तुमच्या शरीरावर प्रभाव पडतो आणि त्यामुळे हृदय आणि मेंदूला खूप नुकसान होते.

सफरचंदाचे दाणे बहुतेक लोक खात नाहीत, पण अनेकवेळा चुकून तोंडात आले तर चघळू नका, गिळू नका, लगेच फेकून द्या. मात्र, या बिया जास्त प्रमाणात खाल्ल्यासच तुमचे नुकसान होते. Amygdalin हा बियाण्यांच्या रासायनिक संरक्षणाचा एक भाग आहे आणि बियाणे पूर्ण असल्यास आणि चघळले नसल्यास ते नुकसान करत नाही.

सायनाइड विषबाधामुळे, तुम्हाला चिंता, डोकेदुखी, चक्कर येणे आणि गोंधळ यासारखी लक्षणे जाणवतील. सफरचंदाच्या बिया प्रमाणात खाल्ल्याने तुमचे किती नुकसान होईल, ते तुमच्या शरीराच्या वजनावरही अवलंबून असते. काही लोकांवर त्याचा फारसा प्रभाव पडत नाही. त्याच वेळी, काही लोकांसाठी ते घातक देखील असू शकते.

सफरचंदाच्या बिया कमी प्रमाणात खाल्ल्यास नुकसान होत नाही, परंतु जर ते रस किंवा संपूर्ण फळ मोठ्या प्रमाणात घेतल्यास नुकसान होते. 2015 च्या पुनरावलोकनानुसार, सफरचंदाच्या 1 ग्रॅम बियांमध्ये अमिग्डालिन सामग्रीचे प्रमाण 1 ते 4 मिलीग्राम मिग्रॅ पर्यंत असू शकते. हे सफरचंदाच्या प्रकारावर देखील अवलंबून असते. तथापि, त्याच्या बियाण्यांमधून सायनाइड सोडण्याचे प्रमाण खूपच कमी आहे.

तज्ज्ञांनी शिफारस केली आहे की, सफरचंदाचा रस बनवतानाही त्याच्या बिया काढून टाकल्या पाहिजेत कारण त्यात ऍमिग्डालिनचे प्रमाण जास्त असते.

(Disclaimer : येथे दिलेली माहिती सामान्य मान्यता आणि माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची पुष्टी करत नाही.)