अंगावरील चरबी मेणासारखी वितळेल, 'या' 5 प्रकारच्या चपात्या खा, महिनाभरात दिसेल फरक

How To Lose 5 kgs In 1 Month: तुम्हीही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आहात का? तर रोजच्या डब्यात किंवा आहारात साधी पोळी न खाता आज आम्ही सांगणार आहोत त्या  पिठाची पोळी खा. यामुळं शरीरावरील अतिरिक्त चरबी तर  कमी होतेच पण शरीराला आणि ताकद देखील मिळते.   

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 7, 2024, 06:30 PM IST
अंगावरील चरबी मेणासारखी वितळेल, 'या' 5 प्रकारच्या चपात्या खा, महिनाभरात दिसेल फरक title=
health tips in marathi eat these flour roti to loss 5 kg weight in just one month

Best Roti For Weight Loss: चपाती किंवा पोळी हा बऱ्याच लोकांच्या डाएटचा भाग असतो. पण तुम्हाला माहित आहे का हीच पोळी तुम्हाला वजन कमी करण्यासाठीही मदत करू शकते. जर तुम्ही योग्य पिठाची निवड करून पोळीचा आहारात समावेश केला तर लवकर वजन कमी करू शकाल. खरंतर पोळी ज्यापासून तयार होते ते पीठ आणि ती बनवण्याची पद्धत या दोन्ही गोष्टी तिची वजन कमी करण्यासाठी तिचा उपयोग आणि पौष्टिकता ठरवतात. न्यूट्रिशनिस्ट और डाइटीशियन शिखा अग्रवाल शर्मा यांच्यानुसार खालील काही पिठाच्या पोळ्या तुम्हाला वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात . 

गहू (गव्हाची चपाती) 

गव्हाची चपाती फाइबर, प्रोटीन आणि काही अत्यावश्यक पोषक तत्त्वांचा उत्तम सोर्स आहे. फायबर पचनक्रियेत मदत करतो आणि जास्त वेळ पोट भरलेलं ठेवतो आणि एकूण कॅलरीची मात्रा शरीरात कमी करण्यासाठी मदत करतो. गव्हाचा ग्लाइसेमिक इंडेक्स हा मैद्याच्या प्रमाणात कमी असतो ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी राहते. त्याचप्रमाणे गव्हामध्ये विटामिन आणि मिनरल्स जसे की आयर्न , मॅग्नेशिअम आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात जे शरीरासाठी गुणकारी आणि आवश्यक असतं. पीठ मळताना कमीत कमी तेलाचा किंवा तुपाचा वापर करावा चपातीसोबत सोयाबीन फायबरयुक्त भाज्या आणि प्रोटीनयुक्त गोष्टी खाल्ल्याने लवकर भूक लागत नाही आणि पोषणदेखील संतुलित राहतं.  

बाजरीची पोळी/ भाकरी 

बाजरी या धान्यात मुबलक प्रमाणात प्रोटीन आणि अँटीऑक्सीडेंट्स असतात. बाजरी आपल्याला पचनक्रिया सुधारण्यास मदत करते तसेच जास्त वेळ पोट भरण्यासाठीही मदतशीर ठरते. यामध्ये ग्लूटेनसुद्धा कमी प्रमाणात असल्याने सीलिएक रोगाने पीड़ित लोकांसाठी हे रामबाण आहे. यामध्ये मैग्नीशियम असतं ज्यामुळे रक्तामध्ये साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासोबतच वजन कमी करण्यासाठी हे मदत करतं. बाजरीचे पीठ थोड्याश्या गव्हाच्या पिठात मिसळून पीठ मळल्याने चपाती छान होते. 

ज्वारीची चपाती/ भाकरी

ज्वारीमध्ये  फाइबर, प्रोटीन आवश्यक मिनरल्स मुबलक प्रमाणात असतात. यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असल्याने लवकर भूक लागत नाही आणि वजन कमी करण्यात मदत होते. यामध्ये फिनोलिक कंपाउंड असतात जे सूज आणि ऑक्सीडेटिव स्ट्रेस कमी करण्यास मदत करतात. ज्वारीचे पीठ कोमट पाण्यात मिसळून नरम पीठ मळून घ्यावे. गरम तव्यावर पोळी भाजून घ्यावी आणि भाजी किंवा दह्यासोबत पौष्टिक जेवणासोबत खावे.  

नाचणीची चपाती/ भाकरी

नाचणीमध्ये कॅल्शियम, फाइबर आणि महत्त्वाचं असं अमीनो एसिड भरपूर प्रमाणात असतं. नाचणी हा कॅल्शिअमचा उत्तम स्रोत आहे. वजन कमी करताना हाडांच्या आरोग्याची काळजी घेणंही तेवढंच महत्त्वाचं असतं. नाचणीमध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स कमी असल्याने शुगर लेवल मॅनेज करण्यास मदत होते. 
यामध्ये असणारे फायबर पचनास मदत करतात. या चपाती/भाकरीसोबत पनीर, टोफूसारखे प्रोटीनयुक्त पदार्थ खाल्ल्याने पोषणमूल्य वाढते. 

ओट्सची चपाती

ओट्समध्ये लवकर मिसळणारे असे फाइबर, प्रोटीन आवश्यक मिनरल्स मुबलक प्रमाणात असतात. बीटा-ग्लूकैनयुक्त हे पीठ फायबरचा उत्तम स्रोत आहे. 
सोबतच हे  कोलेस्ट्रॉल कमी करतं. प्रोटीनने भरलेलं हे धान्य मांसपेशी मजबूत करण्यास आणि त्यांच्या विकासात फायदेशीर ठरतं. लो ग्लाइसेमिक इंडेक्स यामध्ये कमी असतो ज्यामुळे रक्तामध्ये साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासोबतच वजन कमी करण्यासाठी हे मदत करतं. ओट्स दळून त्याची बारीक पावडर करून त्यामध्ये गव्हाचं पीठ मिसळावं आणि मळून घ्यावं. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)