मासिक पाळीत दही खाणे योग्य की आयोग्य? जाणून घ्या फायदे व तोटे

Can We Eat Curd During Periods: मासिक पाळीदरम्याम दही खावे की नाही याबाबत अनेक गैरसमज आहेत. याचे उत्तर जाणून घेऊया.   

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 25, 2023, 06:26 PM IST
मासिक पाळीत दही खाणे योग्य की आयोग्य? जाणून घ्या फायदे व तोटे  title=
Health Tips In Marathi Should you eat curd during periods

Health Tips In Marathi: मासिक पाळीच्या (Diet During Periods) काळात महिलांना आहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागते. कारण या दिवसांत रक्तस्त्राव होत असताना शरीरात लोहाची कमतरता जाणवू लागते. अशावेळी महिलांनी पूर्ण आहार घ्यावा जेणेकरुन लोहाची कमतरता भरून काढता येते. मासिक पाळी सुरू असताना दही खाणे योग्य की अयोग्य याबाबत अनेक समज- गैरसमज आहे. तर, जाणून घेऊया दही खाण्याचे फायदे आणि तोटे. (Health Tips In Periods)

मासिक पाळीत दही खाण्यावरुन मतमतांतरे आहेत. कारण काही जणांच्या म्हणण्यानुसार, दह्यात कॅल्शियम आणि प्रोटीन असते त्यामुळं पाळीच्या दिवसात होणारी पोटदुखी आणि कॅम्पपासून आराम मिळतो. तर, काही तज्ज्ञांच्या मते दही खाल्ल्यास पोटासंबंधीत काही विकार उद्भवू शकतात तसंच, पोट फुगण्याचीही समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळं मासिक पाळीच्या काळात दही खावे की नाही याबाबत जाणून घेऊया. 

मासिक पाळीत दही का खावे? 

दह्यात कॅल्शियम आणि प्रोटीन असतात ज्यामुळं पोटदुखी आणि पीरियड्स क्रॅम्पपासून आराम देऊ शकते 

दह्यात कॅल्शियम असते ज्यामुळं मांसपेशियांना आराम मिळतो. त्याचबरोबर क्रॅम्पपासूनदेखील थोडा दिलासा मिळतो. 

दह्यात प्रोबायोटिक्स असतात जे पाचन होण्यासाठी लाभदायक असतात. 

दह्यात व्हिटॅमिन B12 असते ज्यामुळं एनर्जी लेव्हल वाढते. 

दह्यात लोहाचा उत्तम स्त्रोत असतो ज्यामुळं अॅनीमियापासून लढण्यास मदत होते. 

दह्याचे सेवन केल्यास शरीरातील व्हिटॅमिन Dची कमतरता भरून निघते. 

दह्यात असलेल्या प्रोटीनमुळं शरीराला पोषण मिळते. 

दही का खाऊ नये 

दह्यात जास्त फॅट असते ज्यामुळे पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. काही लोकांना मासिक पाळीत जास्त वेदना होतात, म्हणून त्यांनी ते टाळावे.

काही लोकांना दुधाची अॅलर्जी असते अशावेळी दही खाणे टाळावे. 

दह्यात सोडियम असते ज्यामुळं पदार्थ फुलण्यास मदत होते. तसंच, पीरियड्समध्येही पोट फुगण्याची समस्या निर्माण होते अशावेळी दही खाणे टाळावे. 

नोट 

पीरियड्समध्ये वेदना जास्त होत नसतील तर तुम्ही दह्याचे सेवन करु शकता. मात्र, अगदी कमी प्रमाणात दही खावे. मात्र, पोटात जास्त प्रमाणात दुखत असेल तर मात्र दही खाणे टाळावे. जर तुम्हाला मासिक पाळी दरम्यान दह्याचे सेवन करायचे असेल तर त्याऐवजी तुम्ही दहीपासून बनवलेले ताक, लस्सी किंवा स्मूदी इत्यादी पदार्थांचे सेवन करू शकता. हे केवळ तुम्हाला हायड्रेटेड ठेवणार नाही. उलट, हे मासिक पाळी दरम्यान गमावलेले पोषण देखील भरून काढतील.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)