थंडीच्या दिवसात 'या' 4 चुका ठरतात घातक, हार्ट अटॅकचा धोका अधिक

Heart Attack in Winter : हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका खूप वाढतो, जो आपल्याकडून झालेल्या काही चुकांमुळे देखील असू शकतो. जाणून घेऊया आपल्याकडून झालेल्या काही चुका ज्यामुळे हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jan 6, 2024, 01:41 PM IST
थंडीच्या दिवसात 'या' 4 चुका ठरतात घातक, हार्ट अटॅकचा धोका अधिक  title=

Risk of heart attack in winter: थंडीमुळे अनेकांना त्यांच्या आरोग्याची काळजी वाटते, काहींना सर्दी-खोकल्याचा त्रास होतो तर काहींना हिवाळा येताच त्वचेशी संबंधित समस्या निर्माण होतात. थंडी वाढली की, या आरोग्याच्या समस्याही झपाट्याने वाढू लागतात. परंतु या सर्दीमुळे होणार्‍या सामान्य समस्या आहेत, तर काही लोकांमध्ये थंडीमुळे इतर गंभीर आजारांचा धोका वाढतो. ज्यामध्ये हृदयविकाराचा झटका सारख्या परिस्थितीचाही समावेश होतो. तज्ज्ञांचे मत आहे की, हिवाळ्यात लोक अनेकदा काही चुका करतात ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. हिवाळ्यात हृदयविकाराचा वाढता धोका कमी करण्यासाठी काही खास गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून त्याचा धोका शक्य तितका कमी करता येईल. जाणून घेऊया हिवाळ्यात आपण अनेकदा कोणत्या चुका करतो, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

चुकीच्या सवयी

हिवाळ्यात लोक आपला आहार सांभाळू शकत नाहीत. हिवाळ्यात, लोक तळलेले आणि जास्त साखर असलेले पदार्थ जास्त खाऊ लागतात, ज्यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक आजारांचा धोका वाढतो. विशेषत: ज्यांना आधीच हृदयविकाराच्या समस्या आहेत, त्यांच्यासाठी हिवाळ्यातही आहार पाळणे खूप महत्वाचे आहे.

शारीरिक हालचालींचा अभाव

हिवाळ्याच्या हंगामात, लोक तीव्र थंडीमुळे शारीरिक हालचाली थांबवतात. अनेक दिवस सततच्या थंडीमुळे, लोक सहसा शारीरिक हालचाली करणे बंद करतात. हृदयरुग्णांसाठी, थंडीच्या दिवसात अचानक शारीरिक हालचाली बंद केल्याने काही वेळा हृदयाला हानी पोहोचते.

थंड पाण्यात आंघोळ 

हिवाळा असो किंवा उन्हाळा, काही लोकांना थंड पाण्याने आंघोळ करण्याची सवय असते, परंतु हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करणे सुरक्षित मानले जात नाही. थंड पाण्याने आंघोळ केल्याने शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे रक्तप्रवाहावर परिणाम होतो आणि हृदयावर परिणाम होतो. हृदयविकाराच्या जोखमीचा सामना करण्यासाठी या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

जुने आजार

काहीवेळा हिवाळ्यात जुनाट आजारांवर नियंत्रण ठेवणे कठीण होते. उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉस आणि मधुमेह यांसारखे जुनाट आजार हिवाळ्यात झपाट्याने वाढू लागतात आणि त्यामुळे हृदयविकाराचा धोकाही मोठ्या प्रमाणात वाढतो.