Partner Struggling With Anxiety : प्रत्येकाचे वैवाहिक जीवन हे अनेक चढ-उतारांनी भरलेले असते. जोडीदार आजारी पडला की त्याला आपण डॉक्टरकडे घेऊन जातो. त्याची विशेष काळजी घेतो त्याला बरा करतो. पण कधी कधी पार्टनर चिंतेच्या समस्येने ग्रासलेला असतो. सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीची चिंता पार्टनरला सतावत असते. याचा परिणाम नात्यावर होत असतो. चिंता हा नैराश्याचा एक भाग आहे. जेव्हा चिंता असते तेव्हा जोडीदार नेहमी रागावतो आणि त्याचा स्वभावही चिडचिड होतो. अनेकदा चिंताग्रस्त असलेली व्यक्ती लोकांशी संवाद कमी करते. ही चिंता दीर्घकाळापर्यंत सुरु राहिली तर वैवाहिक जीवनात अनेक प्रकारचे अडथळे येऊ लागतात.
अशा परिस्थितीत जोडीदाराला साथ देण्यासोबतच त्याला समजून घेण्याचाही प्रयत्न करायला हवा. असे केल्याने तुम्ही त्याची चिंता कमी करण्यास मदत करु शकाल. पार्टनरला या टप्प्यातून बाहेर पडण्यास मदत कराल. पार्टनरची चिंता कमी करण्यासाठी काही टिप्स जाणून घेऊया.
तुमच्या जोडीदाराला चिंतेतून बाहेर काढण्यासाठी पार्टनरला कशाची काळजी वाटते? याचा शोध घ्या. असे केल्यास तुम्हाला तुमच्या जोडीदाराला भेडसावणाऱ्या समस्येचा अंदाज येईल. अशाने तुम्ही त्याची/तिची चांगली काळजी घेण्यास सक्षम असाल.
अशा विषयांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करा ज्यामध्ये तुमच्या जोडीदाराला अधिक चिंता वाटते. जोडीदाराला चिंतेतून बाहेर काढताना संयम बाळगा. तुमचा पार्टनर काय म्हणतो ते लक्षपूर्वक ऐका. ज्या विषयाने पार्टनरला जास्त त्रास होईल, असे विषय टाळा.
जर तुमचा पार्टनर चिंताग्रस्त असेल तर त्याच्याशी बोला. आपण त्याच्यासोबत आहोत याची त्याला जाणीव करून द्या. त्याच्याशी बोलत असताना, त्याला कोणत्या गोष्टीची चिंता सतावतेय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही त्याच्यासाठी खास आहात हे तुमच्या जोडीदाराला समजू द्या. यासाठी पार्टनरला, भेटवस्तू द्या, खास प्लानिंग करा. तुम्ही आरामात बोलू शकाल अशा ठिकाणी पार्टनरला घेऊन जा.
खूप काही करूनही तुमच्या पार्टनरमध्ये काही बदल होत नाही असे तुम्हाला वाटत असेल, तर तुमच्या पार्टनरला तज्ज्ञ किंवा थेरपिस्टची मदत घेण्याचे महत्व पटवून द्या. काऊन्सिलरचे सेशल अटेंड करा. असे केल्याने तुम्ही तुमच्या जोडीदाराची समस्या अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल आणि त्याला/तिला चिंतेतून बाहेर पडण्यास मदत कराल. काऊन्सिलर तुम्हाला चिंतेतून कसे बाहेर पडायचे ते सांगतील आणि तुम्हाला चिंता असेल तेव्हा काय करावे याबद्दल तज्ञांकडून सल्ला घ्या.