How To Get Regular Period Naturally: हल्लीच्या धावपळीच्या आणि बदलेल्या जीवनशैलीमुळे आपल्या अनेक दैनंदिन सवयींमध्ये बदल झालेले दिसून येतायत. आजच्या या स्पर्धेच्या टिकून राहण्यासाठी दिवसरात्र मेहनत करणं गरजेचं झालं आहे. पण या सगळ्या गोष्टींमुळे आपलं आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. स्त्रियांच्या या बदललेल्या जीवनशैलीचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर आणि शरिरावर होत आहे.
प्रत्येक महिलेला मासिक पाळी (Menstrual Cycle) येते. मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. या दिवसांत महिलांना पोटात दुखणं, हात-पाय दुखणं, चिडचिड होणं यांसारख्या अनेक वेदना आणि त्रासाला सामोरं जावं लागतं. कारण या दिवसात महिलांच्या हार्मोनल मध्ये बदल होत असतात. पण तुम्हाला माहित आहे का हार्मोनल असंतुलित झाल्यावर महिलांना मासिक पाळीशी निगडीत अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. वेळेवर पाळी न येणं, थायराइड, पीसीओएस, मूड स्विंग्स होणं , नैराश्य यांसारख्या शारिरीक आणि मानसिक समस्यांना सामोरं जावं लागतं.
जर महिलांच्या हार्मोनल मध्ये असंतुलन झाल्यावर त्यांना पाळी ही दर महिन्याला वेळेवर येत नाही, साधरणत: महिलांच्या मासिक पाळीचा कालावधी हा 22 ते 28 दिवसांचा असतो. पण आपल्या योग्य आहारमुळे किंवा अनेक शारिरीक बदलांमुळे आपल्याला मासिक पाळी वेळेवर येत नाही. तुम्ही सुद्धा या समस्येला सामोरं जात असाल तर हा घरगुती रामबाण उपाय करु शकता.
शतावरी ही आपल्या आरोग्यासाठी महत्वाची मानली जाते.
महिलांच्या शरिरातील होणाऱ्या हार्मोनल बदलांसाठी शतावरी खूप उपयोगी आहे. वेळेवर पाळी येण्यासाठी तुम्हाला शतावरी फायदेशीर आहे. शतावरी खाल्यानं मासिक पाळीच्या वेळी पोटात कमी दुखतं, झोपेची समस्यासुद्धा दूर होते, आणि यामुळे थायरॉईड सारखे आजारसुद्धा कमी होतात.
दिवसातून दोनवेळा अर्धा चमचा गरम पाण्यात शतावरी टाकून खा.
याचबरोबर मासिक पाळी वेळेवर येत नसेल तर योगा करा.मासिक पाळीच्या दरम्यान हार्मोन्समध्ये चढ-उतार झाल्यामुळे, पोट फुगणे, गॅस होणे, पोटदुखीचा त्रास, बद्धकोष्ठता आणि पचनाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत या सर्व समस्या दूर करण्यासाठी योगासनांचा फायदा होतो. याचबरोबर जास्त त्रास होत असलेयास वेळीच वैद्यकीय सल्ला घेणं गरचेचं आहे.
(Disclaimer - येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याची पुष्टी करत नाही.)