हाताची त्वचा निघते? मग करा हे घरगुती उपाय!

अनेकदा वातावरण, हंगाम बदलल्याने काही लोकांच्या हाताची त्वचा निघू लागते.

Updated: Jul 27, 2018, 08:40 AM IST
हाताची त्वचा निघते? मग करा हे घरगुती उपाय! title=

मुंबई : अनेकदा वातावरण, हंगाम बदलल्याने काही लोकांच्या हाताची त्वचा निघू लागते. वेळीच याकडे लक्ष न दिल्यास ही समस्या गंभीर रुप धारण करु शकते. हाताची त्वचा निघाल्याने काही वेदना होत नाहीत पण काम करताना थोडा त्रास होतो. पण काही घरगुती उपायांनी तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता. पाहुया कोणते आहेत ते घरगुती उपाय...

गरम पाणी

रोज १० मिनिटे हात गरम पाण्यात बुडवून ठेवा. या गरम पाण्यात तुम्ही मध आणि लिंबू देखील घालू शकता. त्यामुळे हाताची त्वचा नरम होईल आणि त्वचा शुष्क होणे बंद होईल.

व्हिटॉमिन ई युक्त तेल

स्किन पीलिंगपासून सुटका मिळवण्यासाठी व्हिटॉमिन ई युक्त तेल उपयुक्त ठरते. म्हणून रोज या तेलाने हातांना मालिश करा. आराम मिळेल.

ओट्स

एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात ओट्स भिजत घाला. काही वेळानंतर ओट्स नरम पडतील. तेव्हा त्यात १०-१५ मिनिटे हात बुडवून ठेवा. त्यानंतर हात पाण्याने स्वच्छ करा आणि त्यावर मॉश्चराईजर लावा.

कोरफड जेल

रोज झोपण्यापूर्वी हातांना कोरफड जेलने मालिश करा. सकाळी उठल्यावर हात कोमट पाण्याने धुवा आणि मग त्यावर मॉश्चराईजर लावा.