Junk Food खाण्याचा मोह आवरत नाही! या टिप्स फॉलो करुन मिळवा नियंत्रण

Junk Food खाण्यावर नाही क्रंट्रोल, खाली दिलेल्या टिप्स करा फॉलो

Updated: Dec 15, 2022, 05:02 PM IST
Junk Food खाण्याचा मोह आवरत नाही! या टिप्स फॉलो करुन मिळवा नियंत्रण title=

How To Control Junk Food Craving : जंक फूड आरोग्यासाठी हानिकारक आहे हे आपल्याला माहित आहे. जंक फूड खाल्यानं ( Junk Food Side Effect ) होणारे त्रास माहित असले तरी ते खाणं आपण थांबवू शकत नाही. याचं कारण म्हणजे जंक फूडची चव आपल्या जिभेवरच असते आणि त्यामुळेच ते खाण्याची इच्छा ( Junk Food Addiction ) आपल्याला होत असते. जंक फूड खाण्याची इच्छा आपल्याला होत असते. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल किंवा निरोगी रहायचे असेल, तर जंक फूड खाणं बंद करा. काही सोप्या टिप्स फॉलो केल्या तर आपण जंक फूड खाण्याच मोह टाळू शकतो. 

भरपूर पाणी प्या

जर तुमचं पोट रिकामे राहिलं तर तुम्हाला काहीतरी खावेसे वाटणे साहजिक आहे. मग उपाशीपोटी साधारण पदार्थ खायला कोणाला आवडतं, अशा वेळी फक्त फास्ट फूडचा विचार मनात येतो. जंक फूडचा मोह हा नियंत्रित करण्यासाठी भरपूर पाणी प्या. पाण्यानं ऊर्जाही मिळते आणि पोट भरलेलं राहतं, त्यामुळे भूक नियंत्रणात राहते. अशा प्रकारे तुम्ही जंक फूड खाणे टाळू शकता.

हेही वाचा : 'सुशांतसारखंच मलाही..., सगळं संपवण्याचा विचार का आला?' Vivek Oberoi नं केला मोठा खुलासा

वेळोवेळी खा

जेव्हा तुम्हाला भूक लागते तेव्हा काहीतरी हेल्दी खाण्याचा प्रयत्न करा. हेल्दी गोष्टींनी पोट भरेल. एकदा तुमचं पोट भरलं ती जंक फूड खाण्याची इच्छा होणार नाही. यात तुम्ही फळं, ज्यूस आणि काजू खा.  

च्युइंगम खा

जंक फूडची इच्छा च्युइंगमद्वारे थांबवू शकता. च्युइंगम गोड खाण्याची इच्छा नियंत्रणात ठेवण्याचे काम करते. अशा प्रकारे तुम्ही मिठाई आणि जंक फूड खाणे टाळू शकता.

प्रोटीन भरपूर खा

प्रोटीनचे सेवन केल्यानं पोट बराच काळ भरलेले राहते. प्रोटीन युक्त गोष्टी खाल्ल्यानं भूक लवकर लागत नाही आणि तुम्ही जंक खाणं टाळू शकता. तुमच्या आहारात सोया, चीज, दुग्धजन्य पदार्थ आणि कडधान्ये यांचे प्रमाण वाढवा.

पूर्ण झोप

झोप कमी असेल तर जास्त भूक लागते. भूक नियंत्रित ठेवायची असेल तर पुरेशी झोप घ्या. चांगलं खाल्ल्यानं जंक खाणं टाळता येतं.  

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)