'सुशांतसारखंच मलाही..., सगळं संपवण्याचा विचार का आला?' Vivek Oberoi नं केला मोठा खुलासा

Vivek Oberoi नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Updated: Dec 15, 2022, 04:00 PM IST
'सुशांतसारखंच मलाही..., सगळं संपवण्याचा विचार का आला?' Vivek Oberoi नं केला मोठा खुलासा  title=

Vivek Oberoi Shocking Confession : बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयनं (Vivek Oberoi) अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, विवेक ओबेरॉयनं त्याच्या आयुष्यात असा फेस देखील पाहिला जेव्हा तो पडद्यावरून गायब झाला होता. त्या सगळ्या गोष्टींना विवेकनं कशा प्रकारे तोंड दिले याविषयी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत विवेकनं सांगितले आहे. 

या वेळी विवेक म्हणाला, 'जवळपास दीड वर्ष त्याच्याकडे कोणतेही काम नव्हते. तो म्हणाला की जेव्हा तो ऑडिशनसाठी जायचो तेव्हा तो बॉलिवूड अभिनेता सुरेश रॉयचा मुलगा असल्याचे त्यानं सांगितले नाही. आपल्या काळातील आठवणी सांगत तो म्हणाला की त्या काळात त्याच्या मनात अनेक वाईट विचार आले होते. विवेकनं तर सगळं संपवण्याचा विचार केला होता.'

पाहा काय म्हणाला विवेक 

विवेकनं या मुलाखतीत सांगितलं की, 'तो त्याच्या आजूबाजूच्या नकारात्मकतेमुळे त्रस्त झाला होता. त्यामुळे कोणताही व्यक्ती आतुन खचतो. यावेळी त्याच्या पत्नीचे नाव घेच विवेक म्हणाला, 'त्या काळात प्रियंका माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाची होती आणि या काळात मी स्वत: ला ओळखू शकलो. यानंतर तो इशारा करत म्हणाला की सगळं काही संपवण्याचा अर्थ वेगळा आहे आणि ज्या दु: खातूनव सुशांत सिंग राजपुत गेला आहे, त्यावेळी त्याला काय वाटलं असेल हे मला कळू शकतं.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

विवेक म्हणाला की, 'मला डार्क साईड आणि वेदना माहित आहेत ज्या बऱ्याच वेळा खूप जास्त असू शकतात. कधी कधी ते तुम्हाला चिरडण्याचाही प्रयत्न करतात. जेव्हा खोटं पटकन आणि वारंवार बोलले जाते तेव्हा ते सत्य होतं आणि तुम्हाला ते तुमचे सत्य आहे असे वाटू लागते. मात्र, सत्याला फार काळ चूक असल्याचे म्हणता येणार नाही.'

हेही वाचा : 'केशरी कपडे घातलेल्या स्वामींनी मुलींवर बलात्कार केलेला चालतो, पण...', प्रकाश राज यांचा 'Pathaan' ला पाठिंबा

विवेकनं सांगितलें की, 'दुःख विसरून पुढे जाण्याचे धैर्य आईकडून मिळाले. विवेकच्या आईनं त्याला काही कॅन्सरग्रस्त मुलांशी ओळख करून दिली, ज्यांना पाहून त्याला पुढे जाण्याची हिंम्मत मिळाली. दरम्यान, विवेक 'धारावी बॅंक' या चित्रपटात दिसला आहे. या चित्रपटात सुनील शेट्टीची मुख्य भूमिका आहे.