मानसिक आरोग्य चांगलं तंदुरूस्त ठेवण्यासाठी हे करा

दगदगीच्या जीवनशैलात तणाव निर्माण होणं साधारण गोष्ट आहे. त्यामुळे स्वत: ला मानसिकरित्या तंदुरूस्त ठेवणं खूप मोठी गोष्ट आहे. 

Updated: Dec 23, 2019, 06:42 PM IST
मानसिक आरोग्य चांगलं तंदुरूस्त ठेवण्यासाठी हे करा

मुंबई : दगदगीच्या जीवनशैलात तणाव निर्माण होणं साधारण गोष्ट आहे. त्यामुळे स्वत: ला मानसिकरित्या तंदुरूस्त ठेवणं खूप मोठी गोष्ट आहे. जर आपले मानसिक आरोग्य चांगले असेल, तर आपल्या जीवनातल्या अडचणींना आपण सहज हाताळू शकतो. त्याच बरोबर आपल्या प्रगतीसाठी चांगल्या मानसिक आरोग्यची आवश्यकता आहे. मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी खूप उपाय आहेत.

नवीन काही शिकत रहा

मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी काहीतरी नवीन शिकत राहणे आवश्यक आहे. त्याच बरोबर तुम्हाला जे काम आवडते ते वेळ काढून केलं पाहिजे. त्यामुळे तुम्हाला मजा येईल आणि खूप शिकण्यास मदत होईल.

आरोग्यावर लक्ष ठेवा

म्हणतात की, चांगले आरोग्य असल्यास मेंदू ही चांगला राहतो. चांगले आरोग्य ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारावर लक्ष ठेवावे लागेल. त्यासाठी तुम्हाला पोषक आहाराचे सेवन करावे लागेल आणि खूप पाणी प्यायला पाहिजे. त्याशिवाय नियमित व्यायाम करा आणि पुरेशी झोप घ्या. धूम्रपान करू नये.  

सकारात्मक लोकांसोबत वेळ घालवा

अशा लोकांसोबत राहा जे सकारात्मक विचार करतात. जे सामाजिक दृष्ट्या सक्रीय आहेत, ते लोक निरोगी असतात. त्यामुळे प्रसन्न राहण्यास मदत होते, लोकांसोबत चांगली वागणूक ठेवा, त्यासोबत चांगला विचारही करा.

दुसऱ्यांची मदत करा

प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न केले पाहिजे की जेव्हा दुसऱ्यांना गरज असेल, तेव्हा त्यांना मदत करा. दुसऱ्याला मदत केल्याने तुम्हाला खूप आनंद होईल. आनंदी राहिल्याने मेंदुला शांती मिळते.

ताणतणाव दूर ठेवा

आजच्या काळात प्रत्येकाला तणाव असतो. त्यामुळे शारिरीक आणि मानसिक दृष्ट्या आजार होतात. त्यामुळे आपल्याला तणावापासून लांब राहिले पाहिजे. तणावाला लांब ठेवायचे असेल तर व्यवस्थापन असले पाहिजे. म्हणुन नियमित व्यायाम केला पाहिजे जसे की, खेळणे, फिरणे.  

शांत रहा

जीवनात शांत रहाण्यासाठी चिंतन आणि योग करा. त्यामुळे तुम्हाला मानसिकरित्या शांती मिळेल आणि एकाग्रता वाढेल. शांत राहिल्याने मानसिक आरोग्य चांगलं राहिल. त्यामुळे तुम्हाला आयुष्यात जास्त त्रास होणार नाही.

नेमकं काय करायचंय ते ठरवा

तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय करायचे आहे, त्यासाठी गोल सेट करा. तुमच्या लक्ष्य काय आहे, त्यापर्यंत पोहचण्यासाठी काय करू शकता, ते लक्षात ठेवा. त्यासाठी व्यावहारीक मार्गाचा वापर करा. त्यामुळे तुम्हाला जे करायचं आहे, त्यापर्यंत तुम्ही आरामात पोहचणार. त्यामुळे तुम्ही मानसिकरित्या निरोगी राहाल.

गरज असल्यास मदत घ्या

आयुष्यात खूप वेळा अडचणी येतात, त्यासाठी आपल्याला कधी कधी दुसऱ्यांची गरज भासते. त्यामुळे मदत मागितली पाहिजे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपली अडचण कमी होते आणि मानसिकरित्या आपण निरोगी राहतो.