मुंबई : उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वातावरणामध्ये उष्णता असल्याने अन्नपदार्थ खराब होण्याचा धोका अधिक असतो. पुरेशी काळजी न घेतल्यास अन्नपदार्थ खराब होतात. अनेकदा यामध्ये दूध, भाज्या, फळं यांचा समावेश असतो. दूध, फळं, भाज्या असे नाशवंत पदार्थ अधिक दिवस टिकवण्यासाठी तुम्हांला ते फ्रीजमध्ये साठवणं अत्यंत गरजेचे आहे. मात्र फ्रीज नसल्यास किंवा लोड शेडिंगमुळे, वीजेअभावी तो वापरणं अशक्य होत असेल तर अशावेळेस भाज्या, दूध कसे साठवावे? याकरिता या टीप्स नक्की लक्षात ठेवा.
दूध हा नाशवंत पदार्थ आहे. उन्हाळ्यात दूध खराब होऊ नये म्हणून त्याला योग्यरित्या साठवणं आवश्यक आहे. उन्हाळ्यात दूध काही तासांनी गरम करावे. यामुळे ते खराब होण्याची शक्यता कमी होते. नक्की वाचा : फाटलेल्या दूधाच्या पाण्याचे '5' भन्नाट फायदे!
भाज्यांना उन्हाळ्याच्या दिवसात फ्रेश ठेवण्यासाठी त्यांना कपून, सुकवून फ्रिजमध्ये साठवा. यामुळे भाज्या खराब होण्याचा धोका कमी होतो. भाज्यांना वेगवेगळ्या बॅगेमध्ये साठवा.
उन्हाळ्यात दही फार काळ बाहेर ठेवल्यानेही ते खराब होते. दह्यामध्ये बॅक्टेरियांचा प्रभाव वाढल्याने ते आंबट होते, खराब होते. ते टाळण्यासाठी दह्यामध्ये 3 चमचे मध मिसळा. असे दही बाहेर ठेवल्याने अधिक चांगले राहते.
तुमचा फ्रीज इतर बॉटल्स, पाण्याच्या बाटल्या यांनी भरलेला असेल आणि तुम्हांला जॅमची बॉटल ठेवायला जागा नसेल तर बाहेर तुम्ही ठंड पाण्यात जॅमची बॉटल ठेवू शकता. यामुळे जॅमची बॉटल फ्रीजशिवायही अधिक दिवस टिकेल.
मळलेलं गव्हाचं पीठ जास्त काळ बाहेर राहिल्यास ते हळूहळू आंबट होते. अशावेळेस फ्रीजशिवाय कणकेचं मळलेलं पीठ पॉलिथिनमध्ये गुंडाळून थंड पाण्यात ठेवा. यामुळे पीठाचा गोळा आंबट होणार नाही. तसेच हे पीठ हवेशीर जागी ठेवा.
कोणताही पदार्थ साठवताना तो क्रॉस वेन्टिंलेशनमध्ये ठेवावा. म्हणजे एअर टाईट कंटेनरखाली प्लेटमध्ये पाणी ठेवा.