Underwear Washing Rules: कपडे धुण्याचेसुद्धा काही नियम आहेत, हे तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला पटणार नाही. पण हे खरं आहे. आपल्याकडे बऱ्याचदा काय केलं जात धुण्याचे कपडे एखाद्या बकेटमध्ये वेगळे काढले जातात आणि मग ते एकत्र जमा झाले की मग मशीनमध्ये टाकले जातात. पण काही कपडे असे असतात, की जे वेगळे धुतले जातात. आता तुम्हाला वाटेल आम्ही सांगतोय ते रंग जाणाऱ्या कपड्यांविषयी किंवा पांढऱ्या कपड्यांविषयी ज्यांना इतर कपड्यांचा रंग लागून खराब होण्याची शक्यता असते.
आपल्यापैकी बरेच जण अजूनही अंडरवेअर इतर कपड्यांसोबतच एकत्र धूत असाल, पण तुम्हाला माहित आहे असं करणं अगदी चुकीचं आहे. पण अंडरवेअर इतर कपड्यांसोबत का धुतली जात नाही यामागे काय करणं आहे माहित आहे का? चला तर मग आज जाणून घेऊया, अंडरवेअर कशी धुतली गेली पाहिजे आणि का? (How to wash your underwear to kill bacteria and yeast important information in marathi )
एका अभ्यासातून काही महत्वाची माहिती समोर आली आहे. त्यानुसार एका अंडरवेअरमध्ये दिवसाला दिवसाला १० ग्रॅम घाण जमा होऊ शकते, इतर कपड्यांवर होणाऱ्या घाणीच्या तुलनेत ती जास्त हानिकारक असत. त्यामुळे थोडा विचार करा जेव्हा तुम्ही अंडरवेअर इतर कपड्यांसोबत धुता तेव्हा काय होत असेल.
याच अभ्यासानुसार, ज्या पाण्यात अंडरवेअर (underwear) धुतली जाते त्या पाण्यात सुमारे १०० दशलक्ष एस्चेरिचिया कोलाई आणि स्टॅफिलोकोकस ऑरियस बॅक्टेरिया असू शकतात. ज्यामुळे संसर्ग होऊच शकतो. शिवाय इतर मळक्या कपड्यांसोबत अंडरवेअर (underwear) धुतल्याने त्या पाण्यात100 दशलक्ष E. coli (Escherichia coli) पसरू शकतात, ज्यामुळे तुम्हाला संसर्ग होण्याचा धोका आणखी वाढतो.
आता कामं सोपी करण्यासाठी ऑटोमॅटिक वॉशिंग मशिन सर्रास वापरली जाते. कपडे धुवून सुकून निघतात. गृहिणींचा बराच वेळ यात वाचतो. पण कपडे धुब्यासाठी जे पाणी वापरलं जात त्याच एक ठराविक तापमान असावं लागतं. पण आपण एवढा विचार कधीच करत नाही; पाण्याचं तापमान 15 डिग्री सेल्सिअस असेल तर ते पाणी कपडे धुण्यासाठी योग्य आहे.
दिवसभर वापरलेले कपडे ज्यात आपण प्रवास करतो, अनेक ठिकाणी फिरतो, कितीतरी बॅक्टेरिया आपल्या कपड्यांवर जमा झालेले असतात. त्यामुळे विशेष तापमानातच असे कपडे धुतले गेले पाहिजेत.
मग विचार करा अंडरवेअर (underwear) तर किती घाण असेल ती धुण्यासाठी जवळपास 40 अंश सेल्सियस तापमान असलेलं पाणी अंडरवेअर धुण्यासाठी योग्य आहे. शिवाय एखाद्या व्यक्तीला काही संसर्ग झाला असेल आणि तीच अंडरवेअर (underwear) आपल्या इतर कपड्यांसोबत धुतली गेली तर तो संसर्ग आपल्याला होऊच शकतो हे नक्की .
आपल्याकडे कपडे धुण्यासाठी स्ट्रॉंग वापर केला जातो, आणि तेही थंड पाण्यात वापरतो त्याचा काहीच परिणाम होत नाही. अंडरवेअर (underwear) धुण्यासाठी डिटर्जेंट सोबत ब्लिचचा वापर करा आणि तेही गरम पाण्यात तेव्हाच ते स्वच्छ धुतले जातील. आणि संसर्ग पसरवणारे जंतू मरून जातील.