#HumFitTohIndiaFit मध्ये सलमान खानची एंट्री

बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खान हा त्याच्या फीटनेससाठी तरूणांमध्ये कमालीचा लोकप्रिय आहे.

Updated: Aug 12, 2018, 10:53 AM IST
#HumFitTohIndiaFit मध्ये सलमान खानची एंट्री  title=

मुंबई : बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खान हा त्याच्या फीटनेससाठी तरूणांमध्ये कमालीचा लोकप्रिय आहे. काही महिन्यांपूर्वी राज्यवर्धन राठोड यांनी सुरू केलेल्या 'हम फीट तो इंडिया फीट' हे चॅलेंज सुरू केलं होतं. आता या चॅलेन्जमध्ये अभिनेता सलमान खानही उतरला आहे.  

सलमानचा आगामी चित्रपट 'भारत' साठी तो माल्टामध्ये दाखल झाला आहे. काही तासांपूर्वी सलमान खानने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान सायकलिंग आणि जीममध्ये घाम गाळताना दिसला आहे. 

 

सलमान खान आणि सायकलिंग  

सायकलिंग हे सलमानच्या फीटनेस रिजिमपैकी एक आहे. अनेकदा मुंबईच्या रस्त्यांवर सलमान खान त्याच्या सायकलवर फिरताना दिसला आहे. 'बिईंग ह्युमन' या त्याच्या एनजीओ आणि ब्रॅन्डखाली त्याने 'सायकल'ही लॉन्च केल्या आहेत. 

ट्विटरवर सलमान खानने हे फीटनेस चॅलेंज राजकारणी किरण रिजजू यांना दिलं आहे. त्यांनीही सलमानच्या या चॅलेंजला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यापूर्वी नरेंद्र मोदींपासून अनेक राजकारणी आणि सेलिब्रिटी या फीटनेस चॅलेंजमध्ये उतरले आहेत.