Cough Syrup मुळे 66 बालकांचा मृत्यू? भारतीय बनावटीच्या कफ सिरपची चाचणी होणार

सध्या WHO कंपनी आणि नियामक प्राधिकरणांसोबत याची चौकशी करतंय.

Updated: Oct 6, 2022, 09:18 AM IST
Cough Syrup मुळे 66 बालकांचा मृत्यू? भारतीय बनावटीच्या कफ सिरपची चाचणी होणार title=

Gambia Children Deaths News: वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने बुधवारी इंडियाज मेडेन फार्मास्युटिकल्स लिमिटेडने बनवलेल्या 4 कफ सिरपबाबत अलर्ट जारी केलाय. डब्ल्यूएचओने एक चेतावणी देत म्हटलंय म्हटलंय की, हे सर्दी-खोकला सिरप गॅम्बियामध्ये 66 मृत्यू आणि गंभीर समस्यांसाठी जबाबदार असू शकतात. अहवालानुसार, या सिरपमध्ये डाएथिलीन ग्लायकोल आणि इथिलीन ग्लायकोलची अस्वीकार्य मात्रा असल्याचं समोर आलं आहे, जी माणसांसाठी अत्यंत धोकादायक आहेत.

वैद्यकीय उत्पादनाचा इशारा जारी करताना डब्ल्यूएचओने सांगितलं की, 'चारही कफ सिरपच्या नमुन्यांच्या प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये डायथिलीन ग्लायकोल आणि इथिलीन ग्लायकोलची अस्वीकार्य मात्रा आढळून आली आहे.' त्यात असंही नमूद करण्यात आलंय की, दूषित उत्पादनं आतापर्यंत फक्त द गॅम्बियामध्ये आढळून आली आहेत. परंतु ते इतर देशांमध्ये वितरित केले जाण्याची शक्यता आहे. सध्या WHO कंपनी आणि नियामक प्राधिकरणांसोबत याची चौकशी करतंय.

डब्ल्यूएचओ मेडिकल प्रोडक्ट अलर्टने म्हटलंय की, सप्टेंबरमध्ये नोंदवलेली चार निकृष्ट प्रोडक्ट म्हणजे प्रोमेथाझिन ओरल सोल्युशन, कोफॅक्समॅलिन बेबी कफ सिरप, मॅकॉफ बेबी कफ सिरप आणि मॅग्रिप एन कोल्ड सिरप. हे सर्व सिरप हरियाणातील मेडेन फार्मास्युटिकल्स लिमिटेडने बनवलं आहेत.

सिरपमुळे गंभीर आजार किंवा मृत्यूचा धोका

या अलर्टमध्ये डब्ल्यूएचओने म्हटलंय की, हे सर्व सिरप असुरक्षित आहेत आणि त्यांच्या वापरामुळे गंभीर आजार किंवा मृत्यू होऊ शकतो. विशेषतः लहान मुलांमध्ये. याच्या सेवनामध्ये ओटीपोटात दुखणं, उलट्या होणं, जुलाब, लघवी करण्यास समस्या, डोकेदुखी, बदललेली मानसिक स्थिती यांचा समावेश असू शकतो, ज्यामुळे मृत्यू होऊ शकतो.

सिरप वापरू नका: WHO

अलर्टमध्ये, WHO ने पुढे असंही म्हटलंय की, जर तुमच्याकडे ही निकृष्ट उत्पादने असतील तर ती वापरू नयेत. जर तुम्ही हे प्रोडक्ट्स वापरले असतील तर डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्या. या घटनेचा अहवाल राष्ट्रीय नियामक प्राधिकरण किंवा राष्ट्रीय फार्माकोव्हिजिलन्स सेंटरला द्यावा.