कोरोनामुळे भारतात इतक्या लाख लोकांचा मृत्यू, WHO चा दावा

भारत सरकारने WHO ने जाहीर केलेल्या आकडेवारीवर उपस्थित केला प्रश्नचिन्ह

Updated: May 5, 2022, 09:57 PM IST
कोरोनामुळे भारतात इतक्या लाख लोकांचा मृत्यू, WHO चा दावा title=
संग्रहित फोटो

Corona Death in India : जगभरात गेली दोन वर्ष कोरोनाने (Corona) थैमान घातलं. कोरोना जगभरात करोडो लोकांचा मृत्यू झाला. आता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) याचा अहवाल समोर आणला आहे. या अहवालाननुसार गेल्या दोन वर्षात जगभरात सुमारे 15 दशलक्ष लोकांनी कोरोनाव्हायरसमुळे किंवा आरोग्य प्रणालींवर झालेल्या परिणामांमुळे आपले प्राण गमावले आहेत. 

विविध देशांनी दिलेल्या अधिकृत आकडेवारीपेक्षा हा आकडा दुप्पट आहे. यापैकी बहुतेक मृत्यू दक्षिणपूर्व आशिया, युरोप आणि अमेरिकेत झाले आहेत. तर भारतात हा आकडा 47 लाख इतका आहे. अधिकृत आकडेवारीपेक्षा हा आकडा 10 पट जास्त आहे.

डब्ल्यूएचओ प्रमुख टेड्रोस एडनॉम गेब्रेयसस यांनी हा आकडा गंभीर असल्याचं म्हटलं आहे. यातून देशांनी धडा घ्यावा, असं त्यांनी म्हटलं आहे. भविष्यातील आरोग्याशी संबंधित आणीबाणीचा सामना करण्यासाठी देशांनी आरोग्य सेवांशी निगडीत क्षेत्रात अधिक गुंतवणूक करावी असा सल्ला त्यांनी दिला आहे. 

WHO चा अहवाल
WHO ने काही तज्ज्ञांना कोरोना काळात झालेल्या मृत्यूच्या वास्तविक संख्येचं मूल्यांकन करण्याची जबाबदारी दिली होती. या तज्ज्ञांनी दिलेल्या अहवालानुसार, 1.33 कोटी ते 1.66 कोटी लोकांचा मृत्यू एकतर कोरोना विषाणूमुळे झाला आहे किंवा या काळात आरोग्यसेवेच्या कमतरतेमुळे झाला आहे. ही आकडेवारी देशांनी दिलेल्या डेटावर आणि सांख्यिकीय मॉडेलिंगवर आधारित आहे. डब्ल्यूएचओने कोविड-19 मुळे झालेल्या मृत्यूचे तपशील थेट दिलेले नाहीत.

भारताने घेतला आक्षेप
भारताने कोविड-19 मुळे होणाऱ्या मृत्यूंचा अंदाज लावण्याच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला भारत सरकारने कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची नवीन आकडेवारी जाहीर केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 2020 मध्ये 4,74,806 अधिक मृत्यू झाल्याचे दिसून आले. भारताने २०२१ साठी मृत्यूचा अंदाज जाहीर केलेला नाही.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अंदाज सादर करण्यासाठी गणितीय मॉडेल्सच्या वापरावर भारताने जोरदार आक्षेप घेतला. मॉडेल्सची वैधता आणि डेटा संकलनाची पद्धत संशयास्पद असल्याचं भारताने म्हटलं आहे.

भारताने म्हटलं आहे की डब्ल्यूएचओने अतिरिक्त मृत्यूचे अंदाज जारी केले आहेत. डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार कोविडमुळे किंवा आरोग्य सेवांवर त्याचा परिणाम झाल्यामुळे भारतात 47 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.