आईचं दूध विकाल तर खबरदार, होऊ शकते मोठी कारवाई... FSSAI ने दिला इशारा

Sale of Mother Milk Ban : राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अन्न सुरक्षा आयुक्तांना एक आदेश जाहीर करण्यात आला आहे. युनासर मानवी दूध आणि त्याच्या उत्पादनांची विक्री त्वरीत थांबवली जावी. नेमकं काय हे प्रकरण जाणून घेऊया.

राजीव कासले | Updated: May 28, 2024, 07:08 PM IST
आईचं दूध विकाल तर खबरदार, होऊ शकते मोठी कारवाई... FSSAI ने दिला इशारा title=

Sale of Mother Milk Ban : देशात मानवी दूधाची सर्रास विक्री केली जात असल्याचं समोर आलं आहे. भारतात यावर बंदी आहे. पण यानंतरही मानवी दूध विक्रीचा व्यवसाय जोरात सुरु आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आता कठोर आदेश जारी केले आहेत. अन्न नियामक म्हणजे Food Safety and Standards Authority of India ने मातेच्या दुधाच्या विक्री विरोधात खाद्य व्यवसाय चालवणाऱ्यांना इशारा दिला आहे तसंच परवाना देणाऱ्या अधिकाऱ्यांना मानवी दुधाची प्रक्रिया आणि विक्रीसाठी मान्यता देऊ नये असे निर्देश दिले आहेत.

अनेक तक्रारी दाखल
काही संस्था मातेचे दूध खुल्या बाजारात विकत असल्याच्या तक्रारी आहेत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने मानवी दूध आणि त्याच्या उत्पादनांबद्दल एक आदेश जारी केला आहे. यात शा कोणत्याही विक्रीस परवानगी देण्यात आलेली नाी असं नमुद करण्यात आलं आहे. 

काय आहे नवा आदेश?
मानवी दूध आणि त्याच्या उत्पादनांच्या विक्रीबाबत विविध नोंदणीकृत संस्थांकडून भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण माहिती घेत आहे.  FSSAI ने FSS कायदा 2006 आणि त्याअंतर्गत नियमांनुसार मानवी दुधावर प्रक्रिया  किंवा विक्रीला परवानगी नाही.

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सल्ला
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अन्न सुरक्षा आयुक्तांना जारी केलेल्या आदेशात मानवी दूध आणि त्याच्या उत्पादनांच्या विक्रीशी संबंधित अशा सर्व गोष्टींवर त्वरित बंदी आणली जावी असं नमुद करण्यात आलं आहे. या निमयांचं उल्लंघन केल्यास कारवाईचे आदेशही देण्यात आले आहेत. यात 5 वर्षे तुरुंगवास आणि 5 लाख रुपये दंडाची तरतूद आहे.

स्तनपान देणाऱ्या मातांकडून दूध गोळा करून दूध बँकांद्वारे नफ्याने विक्री केली जाते. याची ऑनलाईन विक्री वाढली आहे. आईचे दूध केवळ दान केलं जाऊ शकतं. त्याच्या बदल्यात कोणताही पैसा किंवा लाभ घेता येत नाही. दान केलेलं दूध हे विक्री किंवा त्याचा व्यापार करता येणार नाही. काही कंपन्या दुग्धजन्य पदार्थांच्या नावाखाली मानवी दुधाचा व्यापार करत असल्याचं उघड झालं आहे.