मुंबई : Brain Aneurysm ही एक मेंदू संदर्भातील समस्या आहे. या समस्येदरम्यान तुमच्या मेंदूतील रक्तवाहिनी फुग्यासारखी फुगते. या परिस्थितीमुळे मुळे तुमच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव होऊ शकतो. हे मुख्यतः मेंदू आणि पातळ टिश्यूंमधील जागेत होतं. हा एक प्रकारचा स्ट्रोक आहे आणि अशी परिस्थिती जीवघेणी असू शकते.
या परिस्थितीत ताबडतोब वैद्यकीय उपचार घेणं अत्यंत गरजेचे आहे. यासंदर्भात तुम्हाला, तुम्हाला कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. यासाठी तुम्हाला केवळ वैद्यकीय चाचणी दरम्यानच कळतं.
या परिस्थितीतमध्ये पहिल्यांदा डोकेदुखीची समस्या जाणवते. यामध्ये रूग्णाला मोठ्या प्रमाणात डोकेदुखीचा त्रास जाणवतो. याची प्रमुख दिसून येणारी लक्षणं खालीलप्रमाणे-
ज्यावेळी तुम्हाला तीव्र डोकेदुखी होत असेल त्याचवेळी तुम्ही ताबडतोब डॉक्टरकडे गेलं पाहिजे. तुमच्या सोबत असलेल्या व्यक्तीला जर असा त्रास होत असेल तर त्याला तुम्ही ताबडतोब रुग्णालयात नेलं पाहिजे. अशा प्रकारची स्थिती आर्टरी वॉल्स पातळ झाल्यामुळे देखील होते. ही स्थिती मुख्यतः मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये उद्भवते.