Milk Benefits : तुम्हीही सकाळी दूध सेवन करता? आरोग्याशी खेळू नका, जाणून घ्या दूध सेवनाची योग्य वेळ

Right time to consume milk:  जे डायबिटीजचे रुग्ण आहेत त्यांनी रात्रीच्या वेळी चुकूनही दूध पिऊ नका कारण सकाळी उठल्यावर तुमची शुगर वाढलेली असेल जे तुमच्यासाठी अजिबात योग्य नाहीये. 

Updated: Jan 30, 2023, 04:47 PM IST
Milk Benefits : तुम्हीही सकाळी दूध सेवन करता? आरोग्याशी खेळू नका, जाणून घ्या दूध सेवनाची योग्य वेळ

Best time to drink milk : दूध हा एक असा पदार्थ आहे जो आपण जन्म झाल्यापासून ते अगदी म्हतारे होईपर्यंत पितो. दुधामधील पोषक घटक पाहता भारतीय आयांमध्ये तर आपल्या मुलांना दूध ही पहिली पसंती असते. दुधामध्ये कैल्शियम, थाइमिन, निकोटिनिक एसिड, प्रोटीन आणि इतर अनेक महत्वाचे घटक आढळतात. 
साधारणतः आपण घरी सकाळी उठल्यावर दूध पितो, पण तुम्हाला माहित आहे का दूध पिण्याची सर्वात चांगली वेळ कोणती आहे ? योग्य वेळेत दूध प्यायलात तर त्याचा फायदा तुम्हाला सर्वात जास्त होतो . चला तर मग आज जाणून घेऊया दूध पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती आहे. (Know  the perfect time to consume milk health benefits of milk in marathi ​)

एक्सपर्टनुसार दूध पिण्याची योग्य वेळ जाणून घेऊया

हेल्थ एक्सपर्टनुसार , वय आणि शारीरिक ठेवण जशी असेल त्यानुसार दूध पिण्याची एक योग्य वेळ ठरवली आहे. वयानुसार शरीरात अनेक बदल होत असतात. त्यामुळे वेगवेगळ्या वेळेला दूध पिण्याचा सल्ला दिला जातो.  वयानुसार, पचनशक्तीसुद्धा बदलत जाते त्यामुळे दूध पिताना काही काळजी घ्यावी लागते. 
लहान मुलांचा विचार केला तर, त्यांना सकाळच्या वेळेत दूध देणं सर्वात उत्तम मानलं जात. लहान मुलांना सकाळच्या वेळी फुल क्रीम दूध  देणं सर्वात चांगलं आहे. त्यामुळे कॅल्शियमची कमतरता भरून निघेल. सकाळी दूध प्यायल्याने दिवसभराची कॅल्शियमची कमी भरून निघते.

हाडं मजबूत होण्यापासून ते शरीराला पोटेशियम, फास्फोरस, मैग्नीशियम  प्रोटीन हे सर्व पोषक घटक मिळतात. याचा फायदा म्हणजे दिवसभर खेळण्यासाठी मुलांना ऊर्जा मिळते. ((Know  the perfect time to consume milk health benefits of milk in marathi ​))
ज्यांना शरीर कमवायचं आहे बॉडी बिल्डिंगमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनीसुद्धा दिवसाचं दूध प्यायला हवं. 
 
ज्यांचं वय जास्त आहे, मेटाबॉलिजम आणि पचनशक्ती कमजोर आहे, अशा व्यक्तींनी सकाळी दूध पिऊ नये. कारण सकाळी दूध प्यायल्याने दिवसभर तुमचं पोट भरल्यासारखं  जड वाटू लागेल. 

जेष्ठ नागरिक दिवसभर फार हालचाल करू शकत नाहीत  त्यामुळे त्यांनी सालीवजी संध्याकाळी दूध प्यावं.  त्यांनी गायीचं दूध प्यावं ते पचनासाठी हलकं असतं. 

आयुर्वेदात रात्री गरम दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. पण ज्या व्यक्तींना रात्री झोप येत नाही त्यांनी गरम दूध प्यायल्याने छान झोप लागण्यास मदत होते.