Corona तून बरं होऊनही 2 वर्षांनंतर दिसून येतेय 'ही' समस्या; नव्या अभ्यासातून धक्कादायक बाब समोर

'रेडियोलॉजी'च्या नावाने सायंस जर्नलमध्ये एक अभ्यास पब्लिश झाला आहे, या अभ्यासानंतर जगभरातील जवळपास 60 कोटी लोकं कोरोनातून रिकव्हर झाली आहेत.

Updated: Feb 16, 2023, 03:46 PM IST
Corona तून बरं होऊनही 2 वर्षांनंतर दिसून येतेय 'ही' समस्या; नव्या अभ्यासातून धक्कादायक बाब समोर title=

Long Covid: तुम्हाला कोरोनाची लागण (Corona Infection) झाली होती का? जर तुमचं उत्तर हा, असेल तर हा नवा अभ्यास, तुमची चिंता वाढवू शकतो. कारण नुकत्याच केलेल्या अभ्यासामध्ये (Study) असं समोर आलंय की, कोरोनातून बरं झाल्यानंतर 2 वर्षानंतर देखील तुमची फुफ्फुस पूर्णपणे बरी होत नाहीत. 

'रेडियोलॉजी'च्या नावाने सायंस जर्नलमध्ये एक अभ्यास पब्लिश झाला आहे, या अभ्यासानंतर जगभरातील जवळपास 60 कोटी लोकं कोरोनातून रिकव्हर झाली आहेत. मात्र तरीही या व्यक्तींच्या शरीरातील भागांमध्ये खासकरून फुफ्फुसांमध्ये दीर्घकाळ इन्फेक्शन राहतं. 

हा अभ्यास चीनमध्ये असलेल्या मेडिकल कॉलेज ऑफ हुआझोंग यूनिवर्सिटी ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजीच्या क्विंग यी आणि हेशुई शी यांनी केला आहे.  

कसा झाला हा अभ्यास

या अभ्यासामध्ये कोरोनातून बरं झालेल्या एकूण 144 रूग्णांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये 79 पुरुष आणि महिलांचा समावेश होता. यांचं वयवर्ष 60 वर्ष इतका होता. हे ते रूग्ण होते, जे 15 जानेवारी ते 10 मार्च 2020 या कालावधीमध्ये कोरोनातून मुक्त झाले होते. या लोकांचं 6 महिने, 12 महिने आणि 2 वर्षांमध्ये तीन वेळा सिटी स्कॅन करण्यात आलं. 

या रूग्णांच्या सिटी स्कॅनमधून समोर आलं की, कोविडमधून रिकवर झाल्यानंतर 2 वर्षांनंतर देखील फुफ्फुसांमध्ये अनेक समस्या दिसून आल्या. फुफ्फुसांमध्ये फायब्रेसिस. थिकनिंग, हनीकॉम्बिंग, सिस्टिक चेंज यांसारख्या समस्या दिसून आल्या. 

अभ्यासामधून काय समोर आलं?

स्टडीमधून असं समोर आलं की, 6 महिन्यानंतर 54 टक्के रूग्णांच्या फुफ्फुसांमध्ये समस्या होती. दुसरीकडे 2 वर्षानंतरही 39 टक्के रूग्णांची फुफ्फुसंही पूर्ण पद्धतीने बरी झाली नव्हती. तर दुसरीकडे, 61 टक्के म्हणजेच 88 रूग्णांची फुफ्फुसं निरोगी असल्याचं समजलं.

स्टडीमध्ये असं सांगण्यात आलंय की, या रूग्णांमध्ये श्वास घेण्याची समस्या दीर्घकाळ दिसून आली. 6 महिन्यानंतर 30 टक्के रूग्णांमध्ये ही समस्या दिसून आली. तर दुसरीकडे 2 वर्षानंतर अशा रूग्णांच्ये संख्येत घट होऊन 22 टक्के झाली.

या अभ्यासानुसार, 

  • 2 वर्षानंतर काही रूग्णांना श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याचं दिसून आलं. 
  • 2 वर्षानंतर 29 टक्के रूग्णांना पल्मोनरी डिफ्यूजनचा त्रास असल्याचं समोर आलं.