Food For Sperm Count : धावपळ आणि कामाच्या ताणामुळे लोकांची जीवनशैली (ligestyle) बदलत चालली आहे. तसेच खाण्यापिण्यामध्येही फरक पडला आहे. पौष्टिक पदार्थ सोडून जंक फूडकडे (junk food) लोक वळत चालले आहे. परिणामी पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या (low Sperm Count) कमी होण्याची समस्या वाढते. शुक्राणूंची संख्या कमी असल्याने वंध्यत्वाची समस्या सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुमचा स्पर्म काउंट वाढवायचा असेल तर तुम्ही काही गोष्टी खाणे टाळले पाहिजे. अशा परिस्थितीत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला स्पर्म काउंट कसे वाढवायचे ते सांगणार आहोत…
आपल्या वीर्यामध्ये प्रति मिलिलिटर 15 दशलक्ष पेक्षा कमी शुक्राणू (Sperm Count) असल्यास शुक्राणूंची संख्या सामान्यपेक्षा कमी मानली जाते. तसेच ज्या पुरुषांच्या आहारात पिझ्झा, फ्राईज, मिठाई, सोडा आणि रेड मीट इत्यादी पाश्चात्य पदार्थांचा समावेश असतो, अशा पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या सामान्य आहार घेणाऱ्यांपेक्षा कमी असते. दुसरीकडे जे जास्त पाश्चात्य पदार्थ खातात, त्यांच्यामध्ये प्रजननक्षमता वाढवणाऱ्या प्रजनन संप्रेरकांची (reproductive hormones) कमतरता देखील असते. त्यामुळे पुरुषांनी त्यांच्या आहारातून पाश्चात्य आहार वगळला पाहिजे. याशिवाय जे पुरुष जास्त दारू आणि सिगारेटचे सेवन करतात त्यांच्या शुक्राणूंची संख्याही कमी होते.
या कारणांमुळे शुक्राणूंची संख्या कमी होते
१) धुम्रपान करणे ( smoke)
२) आहारात जंक फूडचा समावेश करणे (junk food)
३) शरीरात ओमेगा ३ (Omega 3) च्या कमतरतेमुळे देखील कमी होतात शुक्राणू
४) घट्ट अंतर्वस्त्रामुळे ( tight underwear)
५) मद्याच्या सेवनामुळे ( alcohol consumption)
६) चरबी वाढवणारे पदार्थ खालल्यामुळे (eating fattening foods)
शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी या गोष्टींचा वापर करा
जर तुम्हाला तुमच्या शुक्राणूंची संख्या वाढवायची (Increase sperm count) असेल, तर तुम्ही तुमच्या आहारात सीफूड, पोल्ट्री, नट, संपूर्ण धान्य, फळे आणि भाज्या यांचा समावेश करा. या सर्व गोष्टींमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड असते. त्यामुळे त्यांचे सेवन केल्याने तुमच्या शुक्राणूंची संख्या वाढते.
शुक्राणूंची संख्या किती असावी?
ज्या पुरुषांच्या आहारात मासे, चिकन, भाज्या, फळे आणि पाणी असतं, त्यांच्या शुक्राणूंची संख्या सरासरी 43 दशलक्ष असते. जे खूप चांगले मानले जाते. ज्या पुरुषांना वंध्यत्वाची समस्या आहे, त्या पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी (Low sperm count) आहे, अशा स्थितीत, निरोगी आहार घेऊन तुम्ही ही समस्या टाळू शकता.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 Taas याची पुष्टी करत नाही.)