वयाच्या चाळिशीनंतरही राहिल तोच उत्साह आणि जोश, या गोष्टींचा खाण्यात करा समावेश!

आहारामध्ये पुढे दिलेल्या गोष्टींचा समावेश करा जेणेकरून वयाच्या 40 शी नंतरही पुरूषांमध्ये उत्साह आणि जोश पाहायला मिळेल.

Updated: Nov 18, 2022, 08:39 PM IST
वयाच्या चाळिशीनंतरही राहिल तोच उत्साह आणि जोश, या गोष्टींचा खाण्यात करा समावेश! title=

Men Health Tips : पुरूषांचा तरूणपणामध्ये मोठ्या प्रमाणात जोश आणि उत्साह असलेला पाहायला मिळतो. मात्र जसजसं वय वाढत जातं तसतसा उत्साह कमी होताना दिसतो. विशेषत: याचा परिणाम विवाहित पुरूषांचा त्यांच्या जोडीदारासोबत नात्यामध्ये दुरावा होण्यास सुरूवात होते. या समस्येमुळे पुरूषांच्या मनातही मोठा न्युनगंड व्हायला सुरूवात होते आणि पुरूष निराशेचे बळी ठरतात. आहारामध्ये पुढे दिलेल्या गोष्टींचा समावेश करा जेणेकरून वयाच्या 40 शी नंतरही पुरूषांमध्ये उत्साह आणि जोश पाहायला मिळेल.

दैनंदिन आहारामध्ये ब्रोकोलीचा समावेश करा. ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन-सी, फायबर, कॅल्शियम आणि लोह हे मोठ्या प्रमाणात आढळतं. तुम्ही ब्रोकोली जशी शक्य असेल तशी खाऊ शकता, म्हणजे उकडलेली किंवा कच्चीसुद्धा. एक आठवड्यात 2-3 वेळा अर्धा कप ब्रोकोलीचा खाण्यामध्ये समावेश करा. 

शरीराची हाडे मजबूत असायला हवी, हाडेच जर कमजोर असतील तर आणि तुमची शारीरिक फिटनेसची चाचणी केली तर त्यामध्ये तुम्ही फिट नसल्याचं  दिसून येईल. कारण हाडं ही मजबूत असायला हवीत, जर हाडे मजबूत करायची असतील तर रोज एक ग्लास दुध घ्यावं. दूधामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शिअम असलेलं पाहायला मिळतं. गार किंवा गरम तुम्हाला जसं शक्य असेल तसं तुम्ही दूध घ्या.

रोज बदाम खावा, कारण बदामामुळे तुमच्या शरीरातील ऊर्जा आणि उत्साह टिकून राहतो. बदामामध्ये व्हिटॅमिन-ई, फायबर आणि प्रोटीन आढळतात. बदाम खाल्ल्याने तुमची पचनसंस्था, त्वचा आणि हृदय तंदरूस्त राहण्यास मदत होते. यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनसॅच्युरेटेड फॅट भरपूर असते. त्यामुळे लठ्ठपणाचा धोकाही राहत नाही.

व्यवस्थित अन्नाचं पचन होण्यासाठी वय झालेल्यांच्या पचनसंस्थेला त्रास होतो. यासाठी आठवड्यातून दोनदा सोयाबीन खा. त्यामध्ये मिनरल्स, अँटी ऑक्सिडंट्स, फायबर, व्हिटॅमिन्स आणि प्रोटीन्स आढळतात. विवाहित पुरुषांना आठवड्यातून 1-2 वेळा याचे सेवन केल्याने अधिक फायदा होईल.

तुम्ही वयाच्या 30 ते 35 पासून रोज व्यायाम केलात तरी याचाही फायदा होऊ शकतो. कारण तरूणपणात आपण व्यायाम करतो मात्र त्यानंतर सोडून देतो, ज्यामुळे चेहऱ्यावर ताजेपणा राहत नाही. त्यामुळे आधीपासूनच व्यायाम सुरू ठेवा.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. Zee 24 तास याची पुष्ठी करत नाही.)